नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध

Nawab Malik : नवाब मलिक सांगा कुणाचे? असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय… ईडी कारवाईनंतर जेलमधून बाहेर आलेल्या नवाब मलिकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाठिंबा दिलाय… हिवाळी अधिवेशनात ते सत्ताधारी बाकावर येऊन बसले होते. मात्र नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्यात… मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपनं विरोध केला. आता विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर एकेका आमदाराचं मत महत्त्वाचं आहे. विधानपरिषदेची रणनीती आखण्यासाठी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला नवाब मलिकही हजर होते. याबाबत पत्रकारांनी जेव्हा अजित पवारांकडे विचारणा केली असता त्यांनी संतप्त प्रत्युत्तर दिले. 

महायुतीत घेण्यास भाजपनं विरोध केलाय. आता विधानपरिषद निवडणुकीत मलिकांचं मत महायुतीसाठी महत्त्वाचं असणाराय.. त्यामुळं असून अडचण नसून खोळंबा अशी अजित पवार गटाची अवस्था आहे… दरम्यान, नवाब मलिकांच्या उपस्थितीबाबत जेव्हा पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे विचारणा केली, तेव्हा तुला का त्रास होतोय असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं.

नवाब मलिकांबाबतचा प्रश्न अजित पवारांना आवडला नाही, हे यातून स्पष्ट दिसलं… तर कोर्टानं मला मीडियाशी बोलण्यास मनाई केलंय, असं सांगत मलिकांनी प्रतिक्रिया देणं टाळलं…दरम्यान, मलिकांवरून आता विरोधकांनीही अजितदादांना चिमटे काढायला सुरूवात केलीय…

हेही वाचा :  राज्यात नवी समीकरणं जुळणार? एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली 'ही' ऑफर! | mim imtiyaz jaleel offers alliance with ncp expects sharad pawar to answer to tackle bjp

एकूणच काय तर नवाब मलिक असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अजित पवारांची अवस्था झालीय.. आताच ही स्थिती असेल तर विधानसभा निवडणुकीत मलिकांचं भवितव्य काय, असा सवालही उपस्थित होतोय.

सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसल्याने नवाब मलिक चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नबाव मलिकांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली होती. मात्र, कामकाज सुरु झाल्यानंतर मलिक थेट सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले.. आणि त्याचमुळे महायुतीत राजकीय चर्चांना उधाण आलंय. मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचीच चर्चा आहे.. जामिनावर सुटल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार यावर चर्चा सुरु होती. मात्र आज अधिवेशनासाठी दाखल झाल्यावर मलिकांनी आधी अजित पवार गटाच्या कार्यालयात भेट दिली.. त्यानंतर मग शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांची गळाभेट घेतली होती. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मला हात लावू नका’, प्रिन्सिपलला शिक्षकांनीच धक्के देत ऑफिसबाहेर काढलं, मोबाईलही खेचून घेतला अन् अखेर…; पाहा VIDEO

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये चक्क महिला मुख्याध्यापकाला धक्क देत कार्यालयाबाहेर काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली …

वसईहून ठाण्याला जाण्यासाठी आता भुयारी मार्ग; काय आहे हा प्रकल्प?

Tunnel Between Vasai To Thane: वसईवरुन ठाण्याला लोकलने जायचं म्हणजे खूप वेळ खर्ची होतो. तर, …