Mukesh Ambani यांनी घेतलं कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठं Syndicate Loan, जाणून घ्या काय आहे प्लान

Mukesh Ambani Syndicated Loan:  मुकेश अंबानी आपल्या बिझनेसचा (Mukesh Ambani Syndicate Loan) अनेकदा विस्तार करताना दिसतात. आत्ताच समोर आलेल्या बातमीनुसार मुकेश अंबानी यांनी भारतातील सर्वात मोठं सिडिंकेट लोन (Mukesh Ambani News) घेतलं आहे. ज्यातून अंबानी मोठ्या प्रमाणावर फंड उभारणार आहेत.

हे सिंडिकेट लोन आत्तापर्यंतच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिंकेट लोन आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं विदेशी मुद्रा ऋण(Foreign Currency Loans) म्हणजे फॉरेन करन्सी लोन्सद्वारे वेगवेगळ्या बॅंकांकडून 5 अब्ज डॉलर्स एवढे पैसे जमवले आहेत. बॅंका आणि वित्तिय संस्थांच्या आधारे सिंडिकेट (Bank Syndicate Loans) लोन घेतले जाते. (Mukesh ambani raised total of 5 billion usd foreign currency loans reporting indias higest syndicate loan in the corporate industry)

काय आहे प्लॅन? 

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ इन्फोकॉम या दोन कंपन्यांनी याद्वारे एकूण 5 बिलियम यूएसडी इतकं रक्कम उभारली आहे. मागील वर्षी रिलायन्सनं 3 बिलियन म्हणजे 3 अब्ज डॉलर्सची रक्कम ही 55 बॅंकांकडून उभारली होती. त्याचसोबत जिओ इन्फोकॉमनं 18 बॅंकांकडून 2 अब्ज डॉलरचं अतिरिक्त क्रिडिट घेतलं आहे. 

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ टेलिकॉमनं या लोनमधून मोठी रक्कम जोडली आहे. रिलायन्स इन्फोकॉमनं 18 बॅंकांकडून 2 अब्ज डॉलरचे अतिरिक्त कर्ज घेतले आहे. तर 31 मार्च पर्यंत त्यांनी 3 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते तर 2 अब्ज डॉलर हे येत्या मंगळवारी जोडले आहेत. 

हेही वाचा :  क्युट ड्रेस परिधान करुन मुकेश अंबानींच्या सुनेने वेधले सर्वांचे लक्ष, पृथ्वीच्या बर्थडेला संतुर मॉम गेली भाव घाऊन

हेही वाचा – रामायण मालिकेसाठी दारा सिंग यांनी केला होता ‘त्या’ गोष्टीचा त्याग..

कुठल्या बॅंकाचा आहे समावेश? 

रिलायन्स जिओनं तर्फे लवकरच 5G नेटवर्क (5G Network) सुरू होणार आहे. त्यासाठी मोठा पैसा लागणार आहे. तेव्हा 55 बॅंकांकडून अंबानींच्या कंपन्यांनी 3 अब्ज डॉलरचं लोन घेतलं आहे. यामध्ये ताईवानच्या बॅंकासोबतच, बॅंक ऑफ अमेरिका, एचएसबीसी, एमयूएफजी, सिटी, एसएमबीसी, मिझुहो आणि अन्य काही आंतरराष्ट्रीय बॅंकांची नावं आहेत. 

मुकेश अंबानी यांनी घेतलेल्या या लोननंतर सध्या सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे. यामध्ये अतिरिक्त कर्ज आणि 55 बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. याआधीही त्यांनी असेच लोन घेतले होते. त्याचीही खूप चर्चा झाली आहे. येत्या काळात यातून मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …