‘मोदी-शाह आता हे 4 पक्ष फोडणार’, राऊतांनी घेतली पक्षांची नावे; म्हणाले, ‘इंडिया आघाडी..’

Sanjay Raut On Loksabha Speaker Election:  उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सध्याच्या राजकीय स्थितीसंदर्भात दोन महत्त्वाची विधानं केली आहेत. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुढील काही काळात 4 राजकीय पक्षांमध्ये फूट पाडू शकतात अशी शक्यता राऊत यांनी थेट पक्षांची नावं घेत व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडी चक्क मोदींचं सरकार ज्यांच्यामुळे आलं त्या पक्षाच्या उमेदवाराला समर्थक करण्याचा निर्णय घेऊ शकते असं म्हटलं आहे.

मोदी-शाह हे चार पक्ष फोडणार

राऊत यांनी भाजपाच्या धोरणावर टीका करताना, भाजपा ज्यांच्याबरोबर एकत्र बसतो त्यांनाच संपवतो असा टोला लगावला आहे. “राहुल गांधी म्हणतात, आम्हाला हवं तेव्हा सरकार पाडू शकतो. याचा अर्थ समजून घ्या. जे एनडीएचं सरकार बनवलं आहे ते स्थिर नाही. मी ऐकलं आहे की चंद्राबाबू नायडूंनी लोकसभेचं अध्यक्षपद मागितलं आहे. त्यांच्याबरोबर जे डील झालं त्यानुसार हे ठरलं आहे. चंद्रबाबूंची ही मागणी योग्य आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदावर एनडीएमधील एखादी व्यक्ती नाही बसली तर सर्वात आधी नरेंद्र मोदी आणि अमित शाहा तेलगु देसम हा पक्ष फोडणार. हे काम सुरु झालं आहे. नितीश कुमार यांची जनता दल युनायटेड पक्ष फोडणार. चिराग पासवानचा पक्ष फोडणार. जयंत चौधरींचा पक्षही फोडणार. त्यांचं कामच हे आहे ज्यांच्याबरोबर बसतात त्यांनाच ते संपवतात. ज्यांचं मीठ खातात त्यांनाच संपवणार. आमचा हा अनुभव आहे,” असं राऊत म्हणाले.

हेही वाचा :  PM Modi: "मोदींसारखा कर्णधार असेल तर पहाटे 6 पासून..."; परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितली सरकारच्या कामाची पद्धत

…तर इंडिया आघाडी त्यांच्या पाठीशी उभी राहणार

“नरेंद्र मोदींचा काय तामझाम राहिला आहे. ते टेकूवर बसले आहेत. राहुल गांधींनी सांगितलं आहे की आम्ही कधीही सरकार पडू शकतो. लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक फार महत्त्वाची आहे. 2014, 2019 सारखी स्थिती आता नाहीये. राहुल गांधी म्हणतात की आम्ही सरकार कधीही पाडू शकतो याचा अर्थ समजून घ्या. हे सरकार टेकून उभं आहे. आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवणार. चंद्रबाबू नायडूंनी त्यांचा उमेदवार लोकसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभा केला तर ‘इंडिया’ आघाडीमध्ये आम्ही चर्चा करु आणि चंद्रबाबू नायडूंच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. आम्ही असा प्रयत्न करणार की पूर्ण ‘इंडिया’ आघाडी चंद्रबाबूंच्या उमेदवाराच्या मागे उभी राहील,” असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ‘वायकरांच्या नातेवाईकाचा फोन EVM शी कनेक्टेड होता’; विरोधकांचा आरोप, गुन्हा दाखल

उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना मिळायला हवं

“या देशाच्या जनतेनं नरेंद्र मोदींना झिडकारलं आहे. नाकारलं आहे. भाजपाचा पराभव केला आहे. त्यांच्या झुंडशाहीचा, हुकूमशाहीचा, संविधानविरोधी भूमिकेचा पराभव केला आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपद पारदर्शकपणे निवडणं गरजेचं आहे. उपाध्यक्ष पद हे आता कायद्यानं, घटनेनं विरोधी पक्षांना मिळायला हवं,” असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा :  ...अन् चिंताग्रस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट फ्रान्सहून अमित शाह यांना फोन, आपुलकीने केली चौकशी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो ‘राम सेतू’… समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती

Ram Setu high resolution photo : राम सेतू… भारतीयांसाठी कमालीचा जिव्हाळ्याचा विषय आणि संशोधकांसाठी संशोधनाचा …

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …