मोदी सरकारने आधार कार्ड संबंधी घेतला मोठा निर्णय, निवडणुकीआधीच दिली गोड बातमी

नवी दिल्लीः 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधीच मोदी सरकारने सर्वसामान्यांना एक भेट दिली आहे. केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना एक जबरदस्त भेट दिली आहे. ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करणाऱ्या यूजर्सला आता फुकटात हे अपडेट करता येवू शकणार आहे. सरकारकडून बुधवारी सांगितले की, पुढील तीन महिन्यांपर्यंत ऑनलाइन आधार अपडेट करणाऱ्याला आता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. याआधी यासाठी ५० रुपये चार्ज आकारला जात होता. परंतु, आता आधार कार्ड अपडेट फ्री मध्ये होणार आहे. ऑफलाइन किंवा केंद्रावर जावून तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता. जाणून घ्या डिटेल्स.

कधीपर्यंत फीस लागणार नाही
आधार कार्ड अपडेटसाठी ५० रुपये चार्ज आकारले जात होते. परंतु, आता १५ मार्च २०२३ पासून १४ जून २०२३ पर्यंत हे फ्रीमध्ये करता येणार आहे. याचाच अर्थ १४ जून २०२३ पर्यंत या अपडेटसाठी कोणतेही चार्ज लागणार नाही.

वाचाः BSNL-Jio-Airtel ला जबरदस्त टक्कर, Vi ने आणला पैसा वसूल प्लान, ७८ दिवसाची वैधता

का घेतला निर्णय
आधार कार्ड जारी होवून जवळपास १० वर्षे झाली आहेत. या दरम्यान अनेक लोकांचा पत्ता, नाव बदलले आहेत. त्यामुळे सुरक्षेचे कारण पाहून UIDAI कडून सर्व आधार कार्डला अपडेट करण्याचा सल्ला दिला गेला आहे. आधार अपडेट ऑनलाइन वेग आणखी वेगवान करण्यासाठी मोदी सरकारकडून ५० रुपये फी तात्पुरती थांबवली आहे.

हेही वाचा :  मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लग्न करणार? मलायकाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

वाचाः HP च्या आणखी एका स्वस्त लॅपटॉपची भारतात एन्ट्री, ११ तासांपर्यंत चालणार बॅटरी, पाहा किंमत

कसे कराल ऑनलाइन आधार अपडेट

स्टेप 1: सर्वात आधी myAadhaar portal वर जा, या ठिकाणी Update your Address Online वर क्लिक करावे लागणार आहे.

स्टेप 2: यानंतर Proceed to Update Address वर क्लिक करावे लागणार आहे.

स्टेप 3: पुन्हा एक नवी विंडो ओपन होईल. ज्यात तुम्हाला १२ डिजिटचा आधार नंबर टाकावा लागेल. पुन्हा Send OTP वर क्लिक करावे लागणार आहे.

स्टेप 4: या नंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. याला व्हेरिफाय करावे लागेल.

स्टेप 5: यानंतर पत्ता प्रूफला अपलोड करून सबमिट करावे लागेल.

स्टेप 6: यानंतर तुमचे आधार अपडेट होईल. तसेच १४ डिजिटचे URN जनरेट होईल. या URN च्या मदतीने आधार अपडेट स्टेट्सचा पत्ता लावून त्याला डाउनलोड करता येणार आहे.

वाचाः Jio ची आणखी ३४ शहरात पोहोचली Jio True 5G सर्विस, महाराष्ट्रातील संपूर्ण लिस्ट पाहा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …

महाराष्ट्रातील ‘या’ गावात सापडली आदिमानवांची 25 हजारवर्षांपूर्वीची अवजारं; अश्मयुगातील अनेक रहस्य उलगडणार

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भोयेगाव जवळ अश्मयुगीन अवजारे सापडली आहेत.  मध्यपाषाण …