मोदी 3.0 सरकारकडून उत्तर प्रदेशला 25 हजार कोटींचा निधी; महाराष्ट्राला अवघे 8828 कोटी

Money Released For All States By PM Modi New Cabinet: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने राज्यांसाठी तब्बल 1.4 लाख कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदींनी घेतलेल्या मोठ्या निर्णयांमध्ये या निर्णयाचा समावेश आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांना त्यांच्या करांच्या हिश्स्यापोटी 1 लाख 39 हजार 750 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यापैकी सर्वाधिक निधी उत्तर प्रदेशला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशला 25 हजार 69 कोटी 88 लाख रुपये देण्यात आले आहेत. तर महाराष्ट्राला केवळ 8 हजार 828 कोटी 8 लाख रुपये देण्यात आले आहेत.

बिहार दुसऱ्या स्थानी

उत्तर प्रदेश खालोखाल सर्वाधिक निधी देण्यात आलेल्या राज्यांमध्ये बिहारचा दुसरा क्रमांक लागतो. बिहारला 14 हजार 56 कोटी 12 लाख रुपये देण्यात आले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 10 हजार 970 कोटी 44 लाख रुपये देण्यात आले आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अधिकृतपणे माहिती दिली. प्रसारमाध्यमांसाठी या राज्यांची यादीच जाहीर करण्यात आली आहे. मार्च महिन्यामध्ये सादर करण्यात आलेल्या हंगामी अर्थसंकल्पात 2024-25 या आर्थिक वर्षासाठी राज्यांचा केंद्रीय करातील वाटा 12 लाख 19 हजार 783 कोटी रुपये ठरवण्यात आला आहे. त्यापैकी आता दुसऱ्यांदा पैसे देण्यात आले आहेत. 

हेही वाचा :  NDA च्या बैठकीत नितीश कुमार 'असं' काही म्हणाले सर्वांनी वाजवल्या टाळ्या; मोदीही खळखळून हसले

एकूण रक्कम 2 लाख 79 हजार 500 कोटी 

आता जारी केलेल्या या नव्या वितरणानंतर राज्यांना वितरित केलेल्या निधीची रक्कम 2 लाख 79 हजार 500 कोटी इतकी झाली आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका येऊ घातल्या आहेत त्यांना निधी वाटपामध्ये झुकतं माप देण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

कोणत्या राज्यांना किती पैसा

उत्तर प्रदेश – 25069.88 कोटी रुपये
बिहार – 14056.12 कोटी रुपये
मध्य प्रदेश – 10970.44 कोटी रुपये
पश्चिम बंगाल – 10513.46 कोटी रुपये
महाराष्ट्र –  8828.08 कोटी रुपये
राजस्थान – 8421.38 कोटी रुपये
ओडिशा –  6327.92 कोटी रुपये
तामिळनाडू –  5700.44 कोटी रुपये
आंध्र प्रदेश – 5.655.72 कोटी रुपये
कर्नाटक –  5096.72 कोटी रुपये
गुजरात – 4860.42 कोटी रुपये
छत्तीसगढ – 4761.30 कोटी रुपये
झारखंड –  4621.58 कोटी रुपये
आसाम –  4371.38 कोटी रुपये
तेलंगणा – 2937.58 कोटी रुपये
केरळ – 2690.20 कोटी रुपये
पंजाब – 2525.32 कोटी रुपये
अरुणाचल प्रदेश – 2455.44 कोटी रुपये
उत्तराखंड – 1562.44 कोटी रुपये
हरियाणा – 1527.48 कोटी रुपये
हिमाचल प्रदेश – 1159.92 कोटी रुपये
मेघालय – 1071.90 कोटी रुपये
मणिपूर – 1000.60 कोटी रुपये
त्रिपुरा – 989.44 कोटी रुपये
नागालँड – 795.20 कोटी रुपये
मिझोरम – 698.78 कोटी रुपये
गोवा – 539.42 कोटी रुपये
सिक्कीम – 542.22 कोटी रुपये

हेही वाचा :  चिमूटभर हळदीने गायब होतील चेहऱ्यावरील व्हाईटहेड्स, वापरा सोपी पद्धत

एकूण – 1,39,750.92 कोटी रुपये



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जरांगे पाटील आणि भुजबळ वाद विकोपाला! भाषेचा दर्जा घसरला; समाजावर काय होणार परिणाम?

Jarange and Bhujbal Dispute: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातला वाद …

मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा! ‘या’ वस्तू आणि सेवा GST कक्षेतून बाहेर; निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा

GST Council Meeting: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच 53 वी जीएसटी परिषद पार पडली. …