चारधाम यात्रेदरम्यान मोबाईल बंदी, काय आहे नियम वाचा

आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करावी असा अनेकांचा मानस असतो. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर उत्तराखंडमधील चारधाम यात्रेचा शुभारंभ झाला. पण यानंतर सरकारने अनेक कठोर नियम व अटी लागू केले आहेत. उत्तराखंड सरकारने लावून दिलेल्या अटीनुसार आता मंदिरापासून 200 मीटरवर मोबाईल फोनन प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चारधाम यात्रा करताना 2000 मीटरपासून मोबाईल बंदी केली आहे. 

मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करताना उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी सांगितले की, या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. चारधाम यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांचा उद्देश फक्त फिरणे, प्रवास करणे असा असतो. अशा लोकांच्या काही कृतींमुळे लोकांच्या श्रद्धेला तडा जात आहे. त्यामुळे ही मोबाईल बंदी घालण्यात आली आहे. 

आम्ही सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवत आहोत की कोणत्याही भाविकाने नोंदणी नसलेल्या वाहनाने किंवा नोंदणी न करता येऊ नये. पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर चार धामला भेट देण्यासाठी नोंदणीची यंत्रणा सुरू झाली आहे. तसेच यावेळी कुठेही चेंगराचेंगरी झाली नसल्याचे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले. अशा अफवा कोणी पसरवल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.

भाविकांची अलोट गर्दी

आजकाल चारधाममध्ये मंदिरे गर्दीने भरलेली असतात. सहा दिवसांत 1,55,584  यात्रेकरू केदारनाथला पोहोचले आहेत. दररोज 10 हजारांहून अधिक भाविक यमुनोत्री धामला पोहोचत आहेत. गंगोत्री धाममध्ये दररोज 12 हजारांहून अधिक भाविक येत आहेत. दोन्ही धामांवर क्षमतेपेक्षा जास्त भाविक येत आहेत. उष्ण ठिकाणांहून येणाऱ्या लोकांना परिस्थितीशी जुळवून घेण्यात अडचण येते.

हेही वाचा :  Sikkim Avalanche: सिक्कीममध्ये हिमस्खलन! 6 पर्यंटकांचा मृत्यू; 150 पर्यटक अडकले, 80 जण बर्फाखाली दबल्याची भीती

त्यामुळेच आतापर्यंत यात्रा मार्गावर विविध ठिकाणी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. हे टाळण्यासाठी आरोग्य विभागाने एकूण 14 भाषांमध्ये आरोग्य सूचना जारी केल्या आहेत. दुसरीकडे, उंच हिमालयात स्थित पंच केदारांपैकी चौथा केदार असलेल्या रुद्रनाथ मंदिराचे दरवाजे 18 मे रोजी उघडले जातील.

आहाराची व्यवस्था 

प्रवासाच्या प्रत्येक थांब्यावर प्रवाशांसाठी जेवण, पाणी, स्वच्छतागृहे आदींची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत कुठेही चेंगराचेंगरी झालेली नाही. अशा अफवा कोणी पसरवल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Explainer : गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत, प्रियंका गांधी ठरणार गेम चेंजर

India Politics : अखेरीस गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत प्रतिनिधीत्व करतील. यातील दोन जागा असतील …

Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट

Special Report On Mahayuti Politics : लोकसभेच्या निकालात महायुतीचा राज्यात धुव्वा उडाला. आता महायुतीत यावरुन …