Milind Soman : मिलिंद सोमणवर लिंगभेद केल्याचा आरोप

Milind Soman : अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) कधी मॉडेलिंगमुळे तर कधी फोटोशूटमुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो एका जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे. मिलिंदने खास पुरुषांसाठी असणाऱ्या भांडी घासायच्या साबणाची जाहिरात केली आहे. ही जाहिरात त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

मिलिंदने काम केलेल्या जाहिरातीत एक मुलगा आईला मदत करण्यासाठी भांडी घासल्याचे सांगत आहे. दरम्यान मिलिंद त्याला ‘विम ब्लॅक’ या नव्या डिश वॉशची माहिती देताना दिसत आहे. तसेच त्या मुलाला टोमनादेखील मारत आहे. सध्या ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 


News Reels

मिलिंदने ही जाहिरात सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे,”पुरुषांसाठी खास भांडी धुण्याचा साबण आला आहे ‘विम ब्लॅक”. पुरुषांनी महिलांना घरकामात मदत करावी या उद्देशाने या प्रोडक्टची निर्मिती करण्यात आली आहे. एकीकडे या प्रोडक्टचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे ही जाहिरात केल्याने मिलिंद सोमणला ट्रोल केलं जात आहे. 

मिलिंद सोमणने शेअर केलेल्या जाहिरातीवर नेटकऱ्यांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. जाहिरातीची निवड चुकीची, भांडी घासण्यासाठी स्त्री-पुरुष भेदभाव का?, फक्त ब्लॅक नाव दिल्यामुळे हे प्रोडक्ट पुरुषांसाठी?, मिलिंद सोमण अशाच जाहिराती करणार, अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी मिलिंदला ट्रोल केलं आहे. तसेच या जाहिरातीत मिलिंदने लिंगभेद केल्याचा आरोप केला जात आहे. 

हेही वाचा :  Mumbai Bomb Blast 1993 : 'या' चित्रपटांतून मोठ्या पडद्यावर उमटली मुंबईतील बॉम्बस्फोटांची भयावह

संबंधित बातम्या

Milind Soman Birthday : न्यूड फोटोशूट ते 25 वर्ष लहान गर्ल फ्रेंडशी लग्न; फिटनेस फ्रीक मिलिंद सोमणचा आज 57वा वाढदिवस



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …