Marathi Serial : ‘रंग माझा वेगळा’ टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर

Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या…

1. टीआरपीच्या शर्यतीत ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 7.0 रेटिंग मिळाले आहे. 

2. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.

3.  टीआरपी लिस्टमध्ये ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे. 

news reels

4. ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे.

5. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 6.0 रेटिंग मिळाले आहे.

हेही वाचा :  'नय्यो लगदा' नंतर 'बिल्ली बिल्ली', सलमाननं शेअर गाण्याचा व्हिडीओ

6. ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे.  

7. टीआरपीच्या शर्यतीत ‘स्वाभिमान’ ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.7 रेटिंग मिळाले आहे.  

8. ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.0 रेटिंग मिळाले आहे. 

9. नव्या स्थानावर ‘अबोली’ ही मालिका आहे. या मालिकेला 3.8 रेटिंग मिळाले आहे. 

10. ‘लग्नाची बेडी’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.4 रेटिंग मिळाले आहे.

‘तुझेच मी गात गात आहे’च्या महाएपिसोडला 5.0 रेटिंग

‘तुझेच मी गात गात आहे’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या या मालिकेच्या महाएपिसोडला 5.0 रेटिंग मिळाले आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या महाएपिसोडला 4.4 रेटिंग मिळाले आहे. 

संबंधित बातम्या

Rang Maza Vegla : ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा-कार्तिकच्या लग्नात पैठणीची थीम; पारंपरिक मराठमोळ्या पोशाखाला पसंती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …