Mahindra ARMADO: बॉम्ब टाका किंवा तोफ डागा! महिंद्राने लष्करासाठी तयार केली जबरदस्त गाडी; टायर फुटला तरी थांबणार नाही

Mahindra ARMADO: महिंद्रा अॅण्ड महिंद्राने (Mahindra and Manhindra) भारतीय लष्करासाठी एक खास वाहन तयार केलं आहे. 120 किमी ताशी वेग, 1000 किलो पेलोड क्षमता, मल्टी-लेअर्स बॅलिस्टिक ग्लॉस लावण्यात आलेला हा मॉन्स्टर ट्रक दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यात सक्षम आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्राची कंपनी महिंद्रा डिफेन्स सिस्टम्सने या जबरदस्त Mahindra ARMADO ची डिलिव्हरी सुरु केली आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीच ट्वीट करत ही माहिती दिली आहे. भारतीय लष्करासाठी तयार करण्यात आलेली ही गाडी वजनाने हलकी असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे. हा वाहनाचा वापर दहशतवादविरोधी कारवाया, अतीसंवेदनशील भागात पेट्रोलिंग आणि स्पेशल फोर्सच्या ऑपरेशनसाठी तयार करण्यात येणार आहे. 

आनंद महिंद्रा यांनी Mahindra ARMADO ची डिलिव्हरी सुरु झाल्यानंतरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटलं की, “#MahindraDefence मध्ये आम्ही आताच भारताची पहिली लाइट स्पेशलिस्ट व्हेईकल (Light Specialist Vehicle) अर्माडोच्या डिलिव्हरीला सुरुवात केली आहे. आपल्या भारतीय सुरक्षा दलांसाठी भारतात डिझाइन आणि डेव्हलप करण्यात आली आहे, जय हिंद” . 

मार्च 2021 मध्ये संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी भारताने एक मोठं पाऊल उचललं होतं. त्यावेळी संरक्षण मंत्रालयाने महिंद्रा डिफेन्सला 1300 लाइट स्पेशलिस्ट व्हेईकल (Light Specialist Vehicle) तयार करण्यासाठी ऑर्डर दिली होती. यासाठी मंत्रालयाने कंपनीशी 1056 कोटींचा करार केला होता. त्यानंतर आता कंपनीने डिलिव्हरीला सुरुवात केली आहे. या वाहनामुळे भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे. 

Mahindra ARMADO मध्ये खास काय?

महिंद्रा डिफेन्स सिस्टमने ARMADO ला पूर्णपणे भारतात तयार केलं आहे. वजनाने हलक्या असणाऱ्या या वाहनात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनेक फिचर्स आहेत. दहशतवादविरोधी कारवाया, अतीसंवेदनशील भागात पेट्रोलिंग आणि स्पेशल फोर्सच्या ऑपरेशनसाठी ही गाडी तयार करण्यात आली आहे. 

हेही वाचा :  तुम्ही फोन पँटच्या 'या' खिशात तर ठेवत नाही ना Smartphone, होऊ शकतो गंभीर परिणाम

ARMADO च्या फिचर्सबद्दल बोलायचं गेल्यास, तिला खासकरुन प्रोटेक्टिव्ह मोबिलिटीसाठी डिझाइन करण्यात आलं आहे. वाहन मागील आणि पुढे अशा दोन्ही बाजूने बॉम्बस्फोटापासून संरक्षण करते. यामध्ये हत्यारं, दारुगोळा ठेवण्यासहित तब्बल 400 किमीपर्यंत सामाना वाहून नेलं जाऊ शकतं. तसंच चार लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. 

याची पेलोड क्षमता 1,000 किलोग्रॅम आहे आणि त्याला सेल्फ-रिकव्हरी विंचसह ऑल व्हील स्वतंत्र सस्पेंशन सिस्टम मिळते.

Mahindra ALSV मध्ये 4-6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनह 3.2 लीटर क्षमतेचं मल्टी-फ्यूइल डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 215 HP ची पॉवर जनरेट करतं. यामध्ये फ्रंट आणि रेअर डिफरेंशियल लॉकसह फोर व्हील ड्राइव्ह सिस्टम देण्यात आलं आहे. जी कोणत्याही रस्त्यावर वाहन सहजपणे धावण्यास मदत करतं. 

ARMADO मध्ये एक सेल्फ-क्लीनिंग एग्जॉस्ट स्कैवेंजिंग आणि एयर फिल्ट्रेशन सिस्टम देण्यात आली आहे. यामुळे वाळवंटात धूल असतानाहा गाडी वेगात धावेल. या कारचा वेग ताशी 120 किमी आहे. फक्त 12 सेकंदात वाहन 0 ते 60 किमीचा वेग पकडू शकते. जर टायर फुटला तरी ही गाडी 50 किमीपर्यंत फ्लॅट टायरवर धावू शकते. 

हेही वाचा :  या बातमीकडे लक्ष द्या! सतत Smartphone चा वापर केल्याने महिलेने दृष्टी गमावली, डॉक्टरांनी केला कारणांचा खुलासा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …