Maharahastra Weather News : कोकणासह मुंबईत जोरदार पावसाचा इशारा; ‘या’ भागांमध्ये ऑरेंज, यलो अलर्ट जारी

Maharahastra Weather News : मान्सूनचं (Monsoon Updates) राज्यातं जोरदार आगमन झाल्यानंतर आता हे नेऋत्य मोसमी वारे राज्याचा बहुतांश भाग व्यापताना दिसत आहेत. गेल्या 48 तासांमध्ये राज्यातील कोकण किनारपट्टी आणि (Mumbai Rains) मुंबई शहर, उपनगर भागात पावसानं जोरंदार हजेरी लावली असून, पुढील 24 तासांमध्ये ही परिस्थिती कायम राहणार आहे. सोमवारी सायंकाळपासूनच शहराच्या बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. ज्यामुळं सखल भागांमध्ये पाणीही साचलं. 

राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यासह अमरावतीच्या मेळघाटातही पावसानं हजेरी लावली. पावसामुळे चिखलदऱ्यातही काहीसं धुकं पडलं आणि वातावरणात गारवा पाहायला मिळाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान ताशी 50 ते 60 किमी वेगानं वारे वाहणार असून, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. 

 

कुठे देण्यात आलाय यलो आणि ऑरेंज अलर्ट? 

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सांगली, सातारा, बुलढाणा, नांदेड, वर्धा, नागपूर, अकोला, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

हेही वाचा :  राज्यात अनेक भागात वळिवाच्या पावसाचा इशारा, पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे

सध्याच्या घडीला मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रबळ झोत अरबी समुद्रावरून पुढे जात असून, कोकणासह मध्य महाराष्ट्रातही प्रगती करताना दिसत आहे. देशाच्या उर्वरित भागात मात्र मान्सून संथ गतीनं प्रवास करत असून महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य राज्य मात्र इथं अपवाद ठरत आहेत. राज्यात सध्या मान्सून लातूर, धाराशिवपर्यंत पोहोचला असून, छत्रपती संभाजीनगरपर्यंतही त्यानं मजल मारली आहे. 

बंगालच्या उपसागरावरून येणारे मान्सून वाऱ्यांचे प्रवाह मंदावले असून, विदर्भात त्यानं अपेक्षित जोर पकडलेला नाही. पण, अरबी समुद्रावरून येणारे मान्सूनचे वारे ही घटही भरून काढताना दिसत आहेत. ज्यामुळं मान्सून पुढील 2 दिवस राज्याताल सुखावह अनुभव देणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? खासदार नव्हे, आमदार होणार; मंत्रीपदही मिळणार?

Pankaja Munde : पराभव होऊनही पंकजा मुंडेंना लॉटरी लागणार आहे. पंकजा मुंडे खासदार नाही तर …

ठाकरेंची नाराजी भोवणार? जयंत पाटलांची विधान परिषदेची वाट खडतर?

Jayant Patil Vidhan Parishad: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणार आहे. या …