LokSabha: महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्याचं काम सर्वात चांगलं? लोकांनी ‘या’ नावाला दिली भरभरुन मतं

LokSabha Opinion Poll: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर Zee News आणि MATRIZE ने ओपिनियन पोल घेतला आहे. यामधून देशात जर सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रासह देशात नेमका काय निकाल लागू शकतो याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या ओपिनियन पोलमध्ये लोकसभेच्या 543 जागांवर 1 लाख 67 हजार 843 लोकांची मतं घेण्यात आली. यादरम्यान लोकांना राज्यासंबंधी तसंच नेत्यांसंबंधी प्रश्न विचारण्यात आले. महाराष्ट्राच्या पोलमध्ये लोकांना मुख्यमंत्र्यांसंबंधी प्रश्न विचारणयात आले असता त्यांनी काय उत्तरं दिली पाहा. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजावर तुमचं मत काय असं विचारण्यात आलं असता 36 टक्के लोकांनी आपण काही प्रमाणात समाधानी असून, कामकाज ठिकठाक असल्याचं म्हटलं आहे. तर 32 टक्के लोकांनी कामकाज चांगलं असून, फार समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर 26 टक्के लोकांनी अजिबात सहमत नसल्याचं मत नोंदवलं आहे.

LokSabha: महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकेल? ओपोनियन पोलचा अनपेक्षित निकाल

 

यावेळी पोलमध्ये सहभागी झालेल्यांना कोणत्या मुख्यमंत्र्यांचं काम सर्वांत चांगलं आहे असंही विचारण्यात आलं. त्यावर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून सर्वात चांगलं काम केल्याची पावती देण्यात आली आहे. 44 टक्के मतं एकनाथ शिंदे, 36 टक्के मतं देवेंद्र फडणवीस आणि 20 टक्के मतं उद्धव ठाकरेंना मिळाली आहेत. 

हेही वाचा :  सुनेत्रा पवारांना उमेदवारीसाठी भाजपचा आग्रह? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

तसंच सध्याच्या घडीला सर्वात प्रभावशाली आणि लोकप्रिय मराठा नेता कोण? असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर एकनाथ शिंदेंना सर्वाधिक 36.2 टक्के मतं मिळाली आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर 21.3 आणि 20.6 टक्के मतांसह उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत. 

महाराष्ट्रात कोणाला किती जागा?

या ओपिनियन पोलनुसार आजच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात एनडीएला म्हणजेच भाजपा, शिंदे गट, अजित पवार गटाला 48 पैकी 45 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला फक्त 3 जागा मिळतील असा अंदाज आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत एनडीएच्या जागांमध्ये 7 आणि मतांमध्ये 4.6 टक्क्यांची वाढ होईल. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा 6 ने कमी होतील आणि मतांमध्ये 4.1 टक्क्यांची घट होईल. 

अजित पवार गट एनडीएत सहभागी झाल्याचा लोकसभा निवडणुकीवर किती परिणाम होईल असं विचारण्यात आलं असता 28 टक्के लोकांना फार तर 32 टक्के लोकांना काही प्रमाणात असं मत नोंदवलं आहे. तर 22 टक्के लोकांनी नुकसान होईल असं म्हटलं आहे. 

DISCLAIMER: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने झी मीडिया आणि मॅट्रिझनं ओपिनियन पोल केला आहे. दोन्ही आघाडी स्थापन झाल्यानंतर आणि राज्यसभा निवडणुकीनंतर ही जनमत चाचणी घेण्यात आली आहे. हे सर्वेक्षण 5 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आले आहे. या ओपिनियन पोलमध्ये लोकसभेच्या 543 जागांवर 1 लाख 67 हजार 843 लोकांची मतं घेण्यात आली. ज्यामध्ये 87 हजार पुरुष आणि 54 हजार महिलांचा समावेश आहे. याशिवाय या ओपिनियन पोलमध्ये 27 हजार नवमतदारांची मतंही समाविष्ट करण्यात आली आहेत. ओपिनियन पोलच्या निकालांमध्ये एक ते दोन टक्क्यांचा फरक पडू शकतो. हे निवडणुकीचे निकाल नाहीत, हा फक्त ओपिनियन पोल आहे. हा ओपिनियन पोल म्हणजे कोणत्याही प्रकारे निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नाही.

हेही वाचा :  राहुल गांधींनी कुत्र्याने खाण्यास नकार दिलेलं बिस्कीट कार्यकर्त्याला दिलं; VIDEO व्हायरल, BJP ने धरलं धारेवर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …