Loan Tips: कर्ज घेताना आणि फेडताना चुका होतायत? वेळीच जाणून घ्या ‘या’ महत्त्वपूर्ण टीप्स

How to Reduce Loan: आपल्या आयुष्यात आता वाढत्या दगदगीमुळे फार मोठ्या प्रमाणात खर्चाचाही (EMI) डोंगर वाढू लागला आहे. त्यातून आपल्या गरजाही वाढत चालल्या असून आपल्या हातात पैसेही कमी येऊ लागले आहेत. त्यातून आपल्यासाठी बचत आणि कमी खर्च करण्याशिवाय कुठलाच मार्ग उरलेला नाही. त्यामुळे आपण सेव्हिंग्स करण्याचा (Saving Tips) मार्ग शोधतो किंवा नाहीतर गुंतवणूकीचे अनेक पर्याय पाहतो. परंतु यात एक म्हत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे कर्ज घेण्याचा. आपल्याला अनेकदा असं वाटतं की, कर्ज घेतल्यानं आपले प्रश्न सुटतील परंतु असे नसते सारखं सारखं कर्ज घेणंही आपल्यासाठी चांगलं नाही. आपला अर्धाअधिक वेळ त्यातच जातो. मग आपण आयुष्यभर फक्त कर्जचं फेडत राहतो. (Loan Tips follow these tips for paying off your debt read full article)

अनेकदा लोकांना असे वाटतं की कर्ज घेतल्यानं आपल्या अनेक समस्या दूर होतील. त्यामुळे आपण अनेकदा कर्ज घेण्याच्या मागे लागतो. आपल्याला आपली तात्काळ गरज आणि मोठी गरज संपवयाची असते म्हणून आपण तशाही प्रयत्नात असतो. परंतु सारखं सारखं कर्ज घेणे हे तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्याही (Loan Tips) चांगलं नाही. त्यामुळे आपल्या अशा काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे ज्यातून तुम्ही कर्जाच्या बोजाापासून वाचू शकता. लक्षात ठेवा की, तज्ञही कायमच कमी कर्ज घेण्यासाठी शिफारस करतात.  तेव्हा जाणून घेऊया की तज्ञांकडून यासाठी तुम्ही कोणत्या टीप्स फॉलो करू शकता. 

हेही वाचा :  अबब! ‘रायगड भूषण’ पुरस्काराचे यंदा २५७ मानकरी ; निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुरस्काराची खैरात?

– तज्ञ सांगतात की, तुमच्या पगारानुसार तुमचा इएमआय फार फार तर 40 टक्के असावा. त्याचबरोबर याची काळजी घ्यावी की, तुमचे इएमआय हा तुमच्या पगाराच्या जास्त नसावा. 

– तुमच्या जवळ कितीही काही झालं तर इमरजन्सी फंड असावा. हा फंड 6 महिन्यांच्या गरजेएवढा असावा. त्यात व्यवस्थित लिक्विडीटी असायला पाहिजे. 

– EMI चुकवताना अजिबातच हलगर्जीपणा करू नका. आपला EMI वेळीच चुकवा. जर त्यात उशीर झालाच तर तुम्हाला त्याचा मोठा फटाका बसूही शकतो. 

– मोठ्या प्रमाणातील लोन्स घेऊ नका. त्यानं तुम्हाला मोठा फटाका बसू शकतो. जर का तुमच्या घरात काही मेडिकल एमरजन्सी आलीच तर तुम्ही फायनॅशियल मदत घ्या परंतु त्यातही तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ नका. तुम्हाला वेळीच चुकवता येईल याकडे लक्ष द्या. 

– क्रेडिट कार्डचा जास्त वापर करू नका तुम्हाला नाहीतर मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. अनेक जण क्रेडिट कार्डचा जास्त वापर न करण्याचा सल्ला देतात. जर त्याचा चुकीचा वापर झाला तर तुम्हाला जास्तीचा व्याजदर भरावा लागतो.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीचा विकास जोरात! AI मुळे उसाचे उत्पादन 30 टक्क्यांनी वाढले; देशातील पहिलाच प्रयोग

कैलास पुरी, झी 24 तास पुणे: बारामतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करत ऊस उत्पादन वाढवणारा यशस्वी …

बाथरूममध्ये ड्रग्जचे सेवन; पुण्यातील FC रोडवर असलेल्या हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

Pune Crime News :  पुणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते इथे होत असलेल्या ड्रग्ज …