लहानपणी मेंदूला गंभीर दुखापत, परंतु मानली नाही हार; शेवटची बनला पोलीस अधिकारी | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

काहीही करायचं म्हटलं तर कष्टाशिवाय पर्याय नसतो. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नसतं. त्यातच बहुतेकवेळा परिस्थितीमुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. कुटुंब, परिस्थिती आणि आपली स्वप्न हे सगळं सांभाळत तारेवरची कसरत कारवाई लागते. मात्र, अनेक वेळा मुलं जबाबदारीमुळे आपलं स्वप्न बाजूला ठेवून वेगळ्या क्षेत्रात जाऊन काम करतात. कोल्हापुरातील सुशांत उपाध्ये हा त्याला अपवाद ठरला आहे. संगणक अभियंता असलेला सुशांत काही काळ पत्रकारिता करत आता थेट पोलीस झाला आहे.

ज्योतिबा पर्यटन आणि धार्मिक क्षेत्र असल्याने येथे रोजगाराच्या अनेक संधी असल्याने शालेय शिक्षण झाले की युवक रोजगाराकडे वळतात. सुशांत उपाध्ये हा याच जोतिबाच्या डोंगरावरील रहिवासी आहे. वडील परंपरागत जोतीबाचे पुजारी. सुशांत अवघा ७ वर्षाचा असताना त्याचा एक अपघात झाला. यात त्याच्या मेंदूला मारही लागला. यामुळे सुशांत नेहमी शांत शांत असायचा. यामुळे पुढे जाऊन हा शिकेल की नाही अशी घरच्यांना ही काळजी वाटत होती. अशातच सुशांत शालेय शिक्षणासाठी ज्योतिबा डोंगरावरीलच ज्योतिर्लिंग विद्यालयात प्रवेश घेतला. सुरुवातीला त्याला त्रास झाला त्याच्यावर उपचार ही सुरु होते. यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि तो पहिली पासूनच शाळेत अव्वल असायचा तर २००७ साली दहावीत त्याने शाळेत ७५ टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला.

हेही वाचा :  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 07 मार्च 2022

सुशांतने पुढेही शकत राहायचं ठरवलं आणि २००८ साली वारणा नगर इथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. १२ वी नंतर त्याने कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज आणि शहाजी कॉलेजमधून २०१२-१३ साली बीसीए डिग्री घेतली. याच दरम्यान सुशांतने २०११ साली बी.सी.ए. द्वितीय वर्षात असताना पहिल्यांदा IBPS ची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ST मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली. मात्र, त्याने पुढील शिक्षण आणि छंद असलेल्या क्षेत्रात काम करायचं असल्याने नोकरी नाकारली आणि पत्रकरिकाता करण्यासाठी २०१५-१६ साली शिवाजी विद्यापीठात पत्रकारितेत पदवीसाठी प्रवेश घेतला. पत्रकारितेत शिक्षण घेत असतानाच सुशांतने एका खाजगी वृत्तवाहिनीसोबत आणि जिल्हा माहिती कार्यालय येथे इंटरनशिप पूर्ण केलं

तर २०१७ साली एका दैनिकात त्याने काम केलं. सोबतच स्वतःची जाहिरात आणि पब्लिक रिलेशन एजन्सी ही सुरू केली.सुशांतचे सर्व काही उत्तम सुरू होतं. मात्र, त्याला स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा होती. यामुळे त्याने २०१८ साली दैनिकातून राजीनामा दिला आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. मुळातच अभ्यासात हुशार असलेला सुशांतने २०१९ साली एमपी एससीची पूर्व परीक्षा आणि नंतर मुख्य परीक्षाही उत्तीर्ण झाला. दरम्यानच्या काळात कोरोना आल्याने भरती थांबली आणि त्याला आपली शारीरिक वाढ करण्यासाठी वेळ मिळाला. नाशिकच्या पोलीस अॅकॅडमीत गुडघ्याची दुखापत सहन करुन, त्याने खडतर ट्रेनिंग पुर्ण केली असून त्याची आता नागपूर इथे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.

हेही वाचा :  ऊसतोड कामगारांचा मुलांच्या अंगावर अभिमानाची वर्दी; भाऊसाहेब गोपाळघरेंची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड

काही दिवसांपूर्वीच त्याचा दीक्षांत समारंभही पार पडला. सुशांत हा त्याच्या गावातील पहिला एम.पी.एस.सी पास झालेला मुलगा असल्याने गावात त्याचे कौतुक ही होत असून जोतीबाच्या डोंगरावरच्या गरीब पुजारी कुटुंबातला पोरगा ते पत्रकार ते अधिकारी हा प्रवास अनेक जणांना प्रेरणा देणारा आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गावची लेक फौजदार बनते तेव्हा साऱ्या गावाला अभिमान वाटतो; वाचा अश्विनीच्या यशाची कहाणी !

MPSC Success Story : आश्विनी शिवाजी वनवे यांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत मेहनत, जिद्द, …

NCERT मार्फत विविध पदांसाठी भरती ; पगार 60000 पर्यंत मिळेल..

NCERT Recruitment 2024 राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची …