सोन्या-चांदीचे भाव पुन्हा कडाडले; 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर जाणून घ्या

Gold and Silver Prices Today On 15-05-2024: अक्षय्यतृतीयेपासून सोन्याच्या दरात सातत्याने  घसरण होत असल्याचे चित्र आहे. सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आज मात्र चित्र वेगळे आहे. आज सोन-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे. गुडरिटर्ननुसार, आज सोनं 430 रुपयांनी महागले आहे. आज सोन्याचा दर 73,250 रुपये इतका आहे. आज चांदीच्या दरातही थोडीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय. आज MCX वर चांदीचा भाव 85,467 रुपये प्रति किलोग्रॅम इतका सुरू आहे. तर, मागील सत्रात म्हणजेच मंगळवारी चांदी 87,600 रुपयांवर बंद झाली होती. 

दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या देशभरात लग्नसराईचे वातावरण आहे. त्यामुळं सोनं-चांदीच्या मागणीत वाढ होत होती. अक्षय्य तृतीयामुळं सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, तेव्हाही मौल्यवान धातुच्या किंमतीत चढ-उतार होत होते. गेल्या काही दिवसांपासून सोनं 72 हजारांच्या आसपास होते. मात्र , आज बाजारात झालेल्या उलाढालीमुळं सोन्याचा दर 73 हाजारांपार गेला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणि इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरमध्ये चढ-उतार यासारख्या जागतिक घटनांचाही भारतीय बाजारातील सोन्याच्या किमतीवर प्रभाव पडतो.

हेही वाचा :  खरेदीदारांसाठी मोठी बातमी! सोनं 2300 रुपयांनी महागलं, तर चांदीच्या दरात..., जाणून घ्या आजचे दर

सोन्याचा आजचा भाव काय? 

गुडरिटर्ननुसार, आज बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज एका 24 कॅरेटसाठी ग्रॅम सोन्याचा दर 6,715 रुपये आहे तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 7,325 इतका आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा किंमत 73,250 रुपये आहेत. तर, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा किंमत 67,150 रुपये असून 18 कॅरेट सोन्याच्या दर 54,940 रुपये इतका आहे. 

सोन्याचे दर कसे असतील?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट   67,150 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   73, 250 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   54, 940 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,715 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,335 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,494  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   53,720 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   58,600 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    43,952  रुपये

हेही वाचा :  Gold Price Today: सोने खरेदी करायचे आहे का? जाणून घ्या आजचा दर

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  67,150  रुपये
24 कॅरेट- 73, 250  रुपये
18 कॅरेट- 54, 940 रुपये



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जरांगे पाटील आणि भुजबळ वाद विकोपाला! भाषेचा दर्जा घसरला; समाजावर काय होणार परिणाम?

Jarange and Bhujbal Dispute: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातला वाद …

मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा! ‘या’ वस्तू आणि सेवा GST कक्षेतून बाहेर; निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा

GST Council Meeting: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच 53 वी जीएसटी परिषद पार पडली. …