पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ‘रिंग रोड’ तयार, कसा असेल? जाणून घ्या

Pune Ganseh Visarjan: पुण्यात होणाऱ्या गणेश विसर्जन मुरवणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. अनेक मानाचे गणपती, ढोल ताशांचा गजर, वादन, लेझर शो असा भव्य मिरवणूक सोहळा पाहायला मिळतो. पुण्याच्या रस्त्यांवर लाखो नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. याचा वाहतुकीला अडथळा येत असल्याने साहजिकच पोलिसांवर ताण येतो. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याची सूचना सर्व मंडळांना केली आहे. मानाचे पाच आणि काही प्रमुख मंडळांना तीन ढोल ताशा पथकांची; तसेच इतर मंडळांना दोन पथकांची परवानगी देण्यात आली आहे. एका पथकात पन्नास ढोल आणि पंधरा ताशे असतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

विसर्जन मिरवणुकीत वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी ‘रिंग रोड’ तयार केला आहे. दरम्यान, सामान्य वाहतुकीसाठी 17 रस्ते बंद, तर 10 ठिकाणी वळण रस्ते करण्यात येणार आहेत. विलंब टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेची माहिती घेऊया.

वाहतुकीसाठी बंद रस्ते

शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्गसन कॉलेज रस्ता, सोलापूर रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोन्या मारुती चौक ते फडतरे चौक, गुरूनानकजी रस्ता.

हेही वाचा :  Video : "बेशुद्ध होईपर्यंत त्याला मारा"; वसतिगृहात विद्यार्थ्याला जबर मारहाण

डायव्हर्जन पॉइंट

जंगली महाराज रस्ता-झाशी राणी चौक, शिवाजी रस्ता-काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलीयार रस्ता-दारुवाला पूल, लक्ष्मी रस्ता-संत कबीर चौक, सोलापूर रस्ता-सेव्हन लव्हज चौक, सातारा रस्ता-व्होल्वा चौक, बाजीराव रस्ता-सावरकर पुतळा चौक, लालबहादुर शास्त्री रस्ता- सेनादत्त पोलीस चौकी, कर्वे रस्ता-नळस्टॉप, फर्गसन महाविद्यालय रस्ता-गुडलक चौक

रिंग रोड

सेनापती बापट रस्ता- गणेशखिंड रस्ता-आंबेडकर रस्ता-नेहरू रस्ता-शिवनेरी रस्ता- सातारा रस्ता-सिंहगड रस्ता- लाल बहादुर शास्त्री रस्ता

तर गुन्हे दाखल होणार

गणपती विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि वेळेत आटोपण्यासाठी पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलिसांकडून गणेश मंडळांना ढोल-ताशा पथकांना बेलबाग, उंबऱ्या गणपती (शगुन) आणि टिळक चौक या केवळ तीन चौकात वादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. मंडळांना या तीन चौकात अवघे दहा मिनिटे वादन करता येणार आहे. तसेच इतर कोणत्याही चौकात; तसेच विसर्जन मार्गावर पथकांना रेंगाळता येणार नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान स्पीकर आणि लेझर लाइट लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धक्कादायक! पुण्यात सापडले ‘झिका’चे 2 रुग्ण; 15 वर्षीय चिमुकलीचाही समावेश

Zika Virus Cases In Pune: पुण्यामधील एरंडवणामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली …

Maharashtra Weather News : बापरे! ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहणार; राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षी नैऋत्य मान्सून वारे वेळेआधीच देशात आणि राज्यात दाखल झाले. …