Kitchen Hacks: अशा प्रकारे टोमॅटो ठेवा, फ्रिज शिवाय राहतील ताजे लाल टपोरे आणि टवटवीत

प्रत्येक घरामध्ये लाल टपोरे टोमॅटो असतात. टोमॅटो ही ताज्या भाज्यांपैकी एक आहे. जास्त लोक टोमॅटो सतत आणायला लागू नये म्हणून एकत्र आणून ठेवतात पण टोमॅटो अधिक काळ राहिल्याने खराब होतात. जर तुमच्याकडे फ्रिज असेल ठिक पण नसेल तर एकाच वेळी खूप टोमॅटो खरेदी करणे म्हणजे पैशाचा अपव्यय ठरू शकतो. कारण उघड्यावर ठेवलेले टोमॅटो लवकर सडू लागतात. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या फ्रिजशिवाय तुम्ही जास्त वेळ टोमॅटो ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहे ते उपाय. (फोटो सौजन्य : iStock)

टोमॅटो साठवण्याची पहिली कृती

टोमॅटो साठवण्याची पहिली कृती
  • टोमॅटो साठवण्यासाठी अर्धा चमचा मीठ आणि हळद मिसळून पाण्यात भिजवलेले टोमॅटो काही मिनिटे राहू द्या.
  • आता ते बाहेर काढा आणि स्वच्छ पाण्याने धुवा आणि पुसून टाका.
  • नंतर कोरड्या कापडाने ते पूर्णपणे वाळवा.उघड्या भांड्यात साधा कागद ठेवा, प्रत्येक टोमॅटो त्यात गुंडाळू ठेवा. स्टेमची बाजू खाली ठेवा.
  • आता हे भांडे कॅबिनेटमध्ये ठेवल्यास, तुम्ही टोमॅटोचा वापर आठवड्यांपर्यंत करू शकता.

(वाचा :- शाहरुखने उलगडलं बाल्कनीत जाण्यामागील गुपित, तुम्ही देखील अशी सजवा बाल्कनी) ​

हेही वाचा :  आता अनोळखी नंबर होणार Mute, WhatsApp घेऊन येतंय एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स

मातीचा उत्तम वापर

मातीचा उत्तम वापर
  • टोमॅटो मातीत ठेवूनही बराच काळ ताजे ठेवता येते. जमिनीवर बाह्य तापमानाचा प्रभाव खूपच कमी असतो, त्यामुळे टोमॅटो बराच काळ ताजे राहतात.
  • यासाठी एका डब्यात कोरडी माती टाकून त्यात टोमॅटो दाबून ठेवा. मग ते बाहेर काढा आणि दररोज वापरा. पण ते काढताना तुमचा हात नेहमी कोरडा असावा हे लक्षात ठेवा.
  • टोमॅटो बाहेर काढल्यानंतर ते योग्य पद्धतीने पुसुन घ्या. (वाचा :- फक्त २ मिनिटांत साफ करा गॅस बर्नर, ही गोष्ट देईल चमत्कारीक रिझल्ट) ​

पुठ्ठ्याचा वापर

पुठ्ठ्याचा वापर
  • टोमॅटो जास्त काळ फ्रिज न ठेवता ताजे ठेवण्यासाठी तुम्ही पुठ्ठा देखील वापरू शकता.
  • यासाठी टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ कापडाने वाळवून त्यात ठेवावे.
  • एका उघड्या बॉक्समध्ये ठेवा आणि आठवड्यातून एकदा काही मिनिटांसाठी हलका सूर्यप्रकाश दाखवा.टोमॅटो लवकर खराब होत नाही.

(वाचा :- Kiara Sidharth करणार या पॅलेसमध्ये लग्नसोहळा, सूर्यगड पॅलेसमधील भन्नाट आयडिया घेऊन घराला द्या ‘रॉयल’ लुक) ​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करताय का? तुम्हीच नाही तर प्रत्येक दुसरा भारतीय नव्या नोकरीच्या शोधात, पण कारण काय?

Job News : शिक्षणाची पायरी ओलांडल्यानंतर प्रत्येकजण मनाजोग्या नोकरीच्या शोधात असतो. सरकारी असो वा खासगी, …

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा; अजब मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics :  महायुतीत प्रचंड तणाव असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. अजित पवारांना महायुतीतून …