Kisan Bharat Band Tomorrow: उद्या भारत बंद? जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता

Bharat Band Announced 2024 on 16 Feb in Marathi: दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन एवढं आक्रमक होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यामध्ये शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020,  शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020 आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020 यांचा समावेश होता. हे कृषी कायदे रद्द झाल्यानंतर शेतकऱ्यांनीही आंदोलन रद्द केलं होते. त्याचदरम्यान सरकारनं त्यांना किमान हमी भाव देण्याचे आश्वासनही दिलं होतं. तसेच त्यांच्या आणखी काही मागण्या पूर्ण करणाचं आश्वासनही देण्यात आलं होतं.

यातपार्श्वभूमीवर शेतकरी आता या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी दबाव आणण्याच्या प्रयत्नात असून शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतीय किसान युनियनने आज (15 फेब्रुवारी) संपूर्ण पंजाबात रेल्वे रोखण्याची घोषणा केली आहे. तसेच केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने उद्या (16 फेब्रुवारी) ग्रामीण भारत बंदचे आवाहन केले आहे. या बंदला आता कामगार संघटनांनी पाठिंबा दिला असून, राज्यात सर्वत रास्ता रोक , मोर्चा, बंद करुन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी पत्राद्वारे दिली. 

हेही वाचा :  Video Viral : रुसलेल्या गर्लफ्रेंडसाठी तिच्या घरासमोरच प्रियकरानं गायलं गाणं; तिला दुसऱ्या तरुणाच्या मिठीत पाहून...

… म्हणून भारत बंदची हाक

ग्रामीण भारत बंदच्या मागे असलेल्या संघटनांनी शेतकऱ्यांना पेन्शन, पिकांसाठी एमएसपी, जुनी पेन्शन योजना लागू करण्याची आणि कामगार कायद्यातील सुधारणा मागे घेण्याची मागणी केली आहे. याशिवाय इतर मागण्यांमध्ये PSU चे खाजगीकरण न करणे, कामगारांचे कंत्राट न देणे, रोजगाराची हमी देणे इत्यादींचा समावेश आहे. 

या संपात शेकऱ्यांनी सहभागी व्हावं, तसेच देशभरातील शेतकरी आणि वाहतूकदारांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  यापूर्वी कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी निवेदन देऊन 16 फेब्रुवारी रोजी भारत बंदची घोषणा केली होती. एमएसपीवर पीक खरेदीची हमी संघटनेने द्यावी, अजय मिश्रा टेनी यांना बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, लहान व मध्यम शेतकरी व कामगारांना किमान 26 हजार रुपये पगाराची कर्जमाफी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. एसकेएम आणि केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेला ग्रामीण भारत बंद 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे. तसेच शेतकरी दुपारी 12 ते 4 या वेळेत देशभरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चक्का जाममध्ये सहभागी असणार आहेत. मिळालेल्या माहितीतनुसार पंजाबमधील बहुतांश राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग शुक्रवारी चार तासांसाठी बंद राहतील.

हेही वाचा :  विमान उड्डाणास 3 तास उशीर झाला तर ? DGCA ने उचललं निर्णायक पाऊल, आता अशी मिळणार माहिती!

भारत बंदमुळे जनजीवन विस्कळीत?

भारत बंदमुळे वाहतूक, शेतीविषयक कामे, मनरेगाची ग्रामीण कामे, खासगी कार्यालये, गावातील दुकाने आणि ग्रामीण औद्योगिक व सेवा क्षेत्रातील संस्था बंद राहणार आहेत. यासंबंधित एसकेएम राष्ट्रीय समन्वय समितीचे सदस्य डॉ दर्शन पाल म्हणाले, ‘या दिवशी सर्व कृषी आणि मनरेगा आणि ग्रामीण कामांसाठी भारत बंद असणार आहे. त्या दिवशी कोणताही शेतकरी, शेतमजूर या ग्रामीण मजूर काम करणार नाही. मात्र या बंदमुळे रुग्णवाहिका, वृत्तपत्र वाटप, विवाहसोहळे, वैद्यकीय दुकाने, बोर्डाच्या परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी आदी आपत्कालीन सेवा सुरु राहणार असल्याची माहिती दिली. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …

लोकांना हसवून करा ‘इतकी’ कमाई! स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअरची सर्व माहिती

Career in Standup Comedy: तुम्हाला लोकांना हसवायला आवडतं? तुम्ही लोकांना हसवू शकता? तुम्हाला लाफ्टर शो …