Kia EV9: एका चार्जिंगमध्ये तब्बल 541 किमीचा मायलेज; फक्त 15 मिनिटात फूल चार्ज! सादर झाली भन्नाट इलेक्ट्रिक SUV

Kia EV9 Electric SUV: दक्षिण कोरियन कंपनी Kia ने जानेवारी महिन्यात आपली इलेक्ट्रिक एसयुव्ही Kia EV9 ला सादर केलं होतं. नोएडामध्ये आयोजित ऑटो एक्स्पोमध्ये (Auto Expo 2023) कंपनीने कारचं कॉन्सेप्ट मॉडल समोर आणलं होतं. मात्र कंपनीने या इलेक्ट्रिक एसयुव्हीचं रेडी मॉडेल सादर केलं आहे. दरम्यान, कंपनीने सादर केलेल्या कॉन्सेप्ट मॉडेलशी तुलना करता रेडी मॉडेल अगदी सारखंच आहे. कारचं इंटिरियअर, डायमेंशन आणि डिझाईन अगदी तसंच आहे जसं कंपनीने कॉन्सेप्ट मॉडेलमध्ये दाखवलं होतं. 

Kia EV9 इलेक्ट्रिक एसयुव्हीला एप्रिल 2023 मध्ये न्यूयॉर्कमध्ये लाँच करण्यात येणार आहे. दरम्यान कार विक्रीसाठी उपलब्ध होण्यासाठी 2025 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कंपनीने 2027 पर्यंत एकूण 15 इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच करण्याची योजना आखली आहे. 

Kia EV9 चे फिचर्स काय?

EV9 चं डिझाईन अॅडव्हान्स आहे. कंपनीने या गाडीला डी-सेगमेंट एसयुव्हीच्या धर्तीवर डिझाइन केलं आहे. E-GMP प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्याने या एसयुव्हीत चांगल व्हीलबेस मिळतो. तसंच केबिनच्या आतमध्ये फार जागाही मिळते. कारच्या फ्रंट एंडमध्ये शार्प आणि एंगुलर फेंडर्ससह बॉक्सी शोल्डल दिले आहेत. Kia EV9 च्या फ्रंट फेसला ‘डिजिटल टायगर फेस’ म्हटलं जात आहे. 

हेही वाचा :  त्वरित पैशांची गरज आहे? आधार कार्डद्वारे मिळेल कर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

कारच्या केबिनमध्ये लेदरचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही. याउलट पर्यावरपूरक गोष्टींचा वापर करण्यात आलेला आहे. Kia EV9 ला त्याच्या इंस्ट्रूमेंटेशन, इंफोटेनमेंट आणि 14 स्पीकर मेरिडियन साऊंड सिस्टम यो दोन्हींसाठी पॅनारोमिक डिस्प्ले मिळतो. 

गाडीच्या मध्यभागी असणाऱ्या सीट 180 डिग्रीत फिरु शकतात असं फिचर देण्यात आलं आहे. याशिवाय पुढील आणि मागच्या सीटवर मसाजचंही फंक्शन आहे. तसंच पुढे आणि मागे अशा दोन्ही ठिकाणी सनरुफ देण्यात आलं आहे. 

Kia EV9 मध्ये कंपनीने लेव्हल 3 अॅडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टंस सिस्टिम (ADAS) दिली आहे. ही सिस्टम हायवे ड्रायव्हिंग पायलट, रिमोट स्मार्ट पार्किंग असिस्ट 2.0 सारख्या अॅडव्हान्स ड्रायव्हिंगचं फिचर देतात. 

Kia EV9 ला कंपनीने दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केलं आहे. यामधील एक लोअर बॅटरी असून दुसरी हायर व्हर्जन आहे. लोअर व्हर्जनमध्ये कंपनीने 76.1 kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे जी रिअर व्हील ड्राइव्ह सिस्टमसह येते. तर हायर व्हर्जनमध्ये 99.8 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.  

या कारमधील 99.8 kWh क्षमतेची बॅटरी सिंगल चार्जमध्ये 541 किमीचा मायलेज देते. EV9 800 व्होल्टच्या फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करते, जी 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 239 किमीची रेंज देते. 

हेही वाचा :  UPI Transaction करताना पैसे गायब? काळजी करू नका, वापरा 'ही' सोपी ट्रिक!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …