कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती, लेखी परीक्षा नाही; 60 हजारपर्यंत मिळेल पगार

KDMC Bharti 2023:  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केडीएमसीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारीच्या एकूण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी एमबीबीएमस उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 60 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. 

स्टाफ नर्स महिलांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असावा. त्याने जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग कोर्स पूर्ण केलेला असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 20 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. 

स्टाफ नर्स पुरुषच्या 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असावा. त्याने जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग कोर्स पूर्ण केलेला असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 20 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

हेही वाचा :  'दृश्यम' स्टाईल थरार; पोलिसांना फोन करुन जेलबाहेर बोलवले, झाडाखाली खोदकाम करताच समोर आले भयंकर दृश्य

वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स महिला आणि पुरुष पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 70 वर्षापर्यंत असावे. निवड झालेल्या उमेदवारांना कल्याण-डोंबिवली येथे काम करावे लागणार आहे. 

उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार नसून थेट मुलाखतीद्वारे ही निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत आणून द्यावेत. 

त्याच दिवशी म्हणजे 3 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. 

उमेदवारांनी आपल्या अर्जासह आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘असा कसा डॉक्टर बनणार रे तू?’; छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी मोठा भाऊ देत होता परीक्षा

Fraud in NEET 2024: देशभरातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल एलिजिबीलीटी एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात येते. …

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Silver Price Today in Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कोसळले असले तरी देशातील बाजारपेठेत …