JEE Main Result 2024: जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील 7 जणांना मिळाले 100 टक्के गुण

JEE Main Result 2024 : जेईई मेन 2024 (JEE Main 2024) च्या दुसऱ्या सत्राचा निकाल नॅशनल  टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीए (NTA)ने जाहीर केला आहे. यात दोन मुलींसह 56 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना jeemain.nta.ac.in या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहता येणार आहे. 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जानेवारी आणि एप्रिल सत्रासाठी पेपर 1 बीई आणि बीटेकचा एकत्रित निकाल बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला. यंदा एकूण 9.24 लाख उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 8.2 लाख उमेदवारांनी जानेवारी आणि एप्रिलमध्ये झालेल्या जेईई मेन परीक्षा दिली होती. यातील 56 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी तेलंगणातील आहेत. तर महाराष्ट्र, आंधप्रदेश प्रत्येकी सात विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तर दिल्लीतील 6 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 

100 टक्के गुण मिळवलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी 

गजरे निलकृष्ण निर्मलकुमार : महाराष्ट्र
दक्षेश संजय मिश्रा : महाराष्ट्र
आर्यन प्रकाश: महाराष्ट्र
विशारद श्रीवास्तव : महाराष्ट्र
पाटील प्रणव प्रमोद : महाराष्ट्र
अर्चित राहुल पाटील : महाराष्ट्र
मुहम्मद सुफियान : महाराष्ट्र

हेही वाचा :  Isha Ambani Anand Piramal Twins : अंबानींच्या लेकीची संपत्तीही डोळे दिपवणारी, जुळ्या मुलांची आई ईशा सर्वात तरुण अरबपती

तसेच JEE Main 2024 च्या दुसऱ्या सत्राचा निकालात 100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यंदाही तेलंगणामधील सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तेलंगणातील 15 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तसेच यात महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्याना 100 टक्के गुण मिळवले आहेत. त्यासोबतच आंधप्रदेशातील सात आणि दिल्लीतील प्रत्येकी सहा विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तब्बल 2 लाख 50 हजार 284 मुलांनी आयआयटी प्रवेश परीक्षा जेईई ऍडव्हान्स साठी पात्र ठरले आहेत.

या राज्यातील विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण 

तेलंगणा: 15 विद्यार्थी

महाराष्ट्र: 7 विद्यार्थी

आंध्र प्रदेश : 7 विद्यार्थी

राजस्थान : 5 विद्यार्थी

दिल्ली (NCT): 6 विद्यार्थी

कर्नाटक : 3 विद्यार्थी

तामिळनाडू: 2 विद्यार्थी

पंजाब: 2 विद्यार्थी

29 विद्यार्थ्यांवर कारवाई

दरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या 29 उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षांसाठी ही परीक्षा देता येणार नाही. तसेच या परीक्षेच्या दुसऱ्या सत्रात 10 लाखांहून अधिक विद्यार्थी होते. ही परीक्षा आसाम, बंगाल, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांमध्ये घेण्यात आली होती. या निकालात 100 टक्के गुण मिळवलेल्या 56 उमेदवारांपैकी 40 उमेदवार सर्वसाधारण गटातील आहेत. तर 10 ओबीसी, 6 ईडब्ल्यूएस श्रेणीतील आहेत.

हेही वाचा :  आता वंदे भारत एस्क्प्रेस प्रतितास २०० किमीच्या वेगाने धावणार, रेल्वे विभाग करतंय ‘या’ मोठ्या सुधारणा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …