Jayant Patil: जयंत पाटलांचा प्लॅन बी काय होता? म्हणतात, ‘लहानपणापासून मला वाटायचं की…’

Jayant Patil News: गेल्या काही दिवासांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील वाद चव्हाट्यावर आलाय. अजितदादांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार, जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासमोर आपली प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा बोलून दाखवली अन् सर्वांच्या नजरा जयंत पाटलांवर खिळल्या. अजित पवारांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत आलबेल नसल्याच्या कुणकुण जाणवतेय. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र, पाटील इतक्या काय हार मानणार नाहीत, असंच चित्र दिसतंय. अशातच आता जयंत पाटलांनी त्यांचा प्लॅन बी सांगितला आहे.

आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI Photos) मदतीने महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे डिस्नी स्टाईल कार्टुन स्टाईलमध्ये (Disney cartoons) साकारले होते. सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो व्हायरल झाल्याचं दिसतंय. अशातच आता जयंत पाटील यांनी या एआय फोटोवर कमेंट केली आहे.

काय म्हणतात जयंत पाटील?

अमित वानखडे यांचे या आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार केलेल्या पेंटिंगसाठी मनापासून आभार, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावेळी त्यांनी मनातील इच्छा व्यक्त करून दाखवली. पुढील चित्रात मला स्वतःला सिव्हिल इंजिनियर (Civil Engineer) म्हणून बघायला आवडेल, कारण इंजिनियर बनून मोठे प्रोजेक्ट्स उभे करावेत, असे मला लहानपणासून वाटायचे, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा :  'एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय'; जरांगेंचा फडणवीसांना टोला! म्हणाले, 'बांगड्या भरल्यागत चाळे...'

पाहा पोस्ट – 

जयंत पाटलांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं होतं.  वडील राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर त्यांनी मतदारसंघाची जबाबदारी सांभाळली आणि शरद पवार यांच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपला जम बसवला. 1990 पासून जयंत पाटील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

आणखी वाचा – पुण्यात तरूणीवर कोयता हल्ला झाल्यानतंर राज ठाकरे संतापले; शिंदे सरकारला म्हणाले “डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे…”

दरम्यान, जयंत पाटील यांनी गृहमंत्री, जलसंपदा मंत्री आणि अर्थमंत्री इत्यादी पद भूषवली आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आता छगन भुजबळ यांनी ओबीसी प्रदेशाध्यक्ष असावा, अशी मागणी केल्याने जयंत पाटील पद सोडणार का? शरद पवार कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …