मुंबई मेट्रोसंदर्भात महत्वाची अपडेट, MMRDA कडून 131 खर्च; प्रवाशांना मिळणार ‘हा’ फायदा

Mumbai Metro 4 corridor Track: मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे हळुहळू विस्तारत आहे. हजारो प्रवाशांना याचा फायदा होतोय. मेट्रो प्रवाशांसाठी मेट्रो संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे.  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मेट्रो-4 आणि मेट्रो-4A कॉरिडॉरसाठी ट्रॅक खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. गायमुख ते मुलुंड अग्निशमन केंद्रापर्यंत ट्रॅक टाकण्याचे काम एमएमआरडीए सुरू करणार आहे. या मार्गावरील ट्रॅक खरेदीसाठी सुमारे 131.12 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परिसरातून जाणाऱ्या या मेट्रो मार्गाचे काम गेल्या वर्षीच्या मध्यापर्यंत अत्यंत संथ गतीने सुरू होते. नवीन कंत्राटदाराच्या नियुक्तीनंतर संथ गतीने सुरू असलेल्या एमएमआरच्या सर्वात लांब मेट्रो कॉरिडॉरच्या बांधकामाला वेग आला आहे. चार वर्षांत मेट्रोचे केवळ २५ टक्के काम पूर्ण होऊ शकले. सध्या मेट्रोच्या या मार्गाचे काम 55 टक्के पूर्ण झाले आहे. वडाळा-कासारवडवली-गायमुख दरम्यान मेट्रो-4 आणि मेट्रो-4एचे बांधकाम सुरू आहे.
 
मेट्रो 4 2018 पासून आणि मेट्रो 4A कॉरिडॉर 2019 पासून बांधण्यात येत आहे. दोन्ही कॉरिडॉरचे बांधकाम 2022 च्या आसपास पूर्ण होणार होते. मात्र एका कंत्राटदाराने काम पूर्ण न केल्याने मेट्रो 4 चे काम अनेक महिने रखडले होते. आता बांधकामाचा वेग वाढविण्यासाठी मुख्य कंत्राटदाराचे काम उपकंत्राटदाराकडे देण्यात आले आहे.

हेही वाचा :  Guatami Patil : गौतमी पाटील पुन्हा चर्चेत; थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी

15 हजार कोटींचा प्रकल्प

MMRDA मेट्रो 4 कॉरिडॉरवर एकूण 14 हजार 549 कोटी रुपये आणि मेट्रो 4A कॉरिडॉरवर एकूण 949 कोटी रुपये खर्च करत आहे. संपूर्ण कॉरिडॉरच्या मार्गावर एकूण 32 स्थानके असतील. मेट्रो-4 सध्या चालू असलेल्या मेट्रो-1, मेट्रो 6, मेट्रो 5 आणि इतर मेट्रो मार्गांशी जोडली जाईल.

रहदारी टाळा

मुख्य कंत्राटदाराऐवजी उपकंत्राटदाराकडून काम करून घेण्याच्या एमएमआरडीएच्या निर्णयाने संथगतीने सुरू असलेल्या प्रकल्पाला गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याच्या बांधकामानंतर एलबीएस मार्गाजवळील लोकांचीही वाहतूक समस्येतून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. ही मार्गिका सुरू झाल्यानंतर प्रवाशांना ठाण्यापासून मुंबईच्या प्रत्येक भागात जाण्यासाठी मेट्रोच्या रूपात एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर घोडबंदर रोडची वाहतूकही कमी होऊ शकते.

एमएमआरच्या सर्वात लांब कॉरिडॉरचे बांधकाम कंत्राटदारामुळे आधीच दोन वर्षे लांबले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या परिसरातून जाणाऱ्या मेट्रो मार्गाचे काम रखडल्याने प्राधिकरणावर मोठा ताण निर्माण झाला होता. तेव्हापासून या प्रकल्पावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

प्रकल्पाची सद्यस्थिती

मेट्रो-4, 4A – 55% काम पूर्ण

हेही वाचा :  घर चालवायला नव्हते पैसे; दागिने विकून घेतली गाय, नमिता बनल्या करोडपती!

मेट्रो 4 च्या 1476 खांबांपैकी 973 खांब तयार आहेत.

मेट्रो 4A चे 221 पैकी 143 खांब तयार आहेत



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …