फडणवीसांच्या कारसेवेचा पुरावा! अयोध्येला जाणार्‍या गर्दीतील ‘तो’ फोटो केला शेअर

Ayodhya Ram Mandir: मी कारसेवक असल्याचा मला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा सांगितले. फडणवीसांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी फोटो शेअर करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. 

पहिल्या कारसेवेला 20व्या वर्षी गेलो होतो. त्यावेळी बदायूच्या जेलमध्ये 18 दिवस होतो.  दुसऱ्या कारसेवेच्यावेळी जेव्हा कलंकित ढाचा खाली आला तेव्हा मी तिथेच होतो, असे फडणवीसांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले होते. तसेच अटलजींच्या काळात तिसरी कारसेवा झाली तेव्हाही मी तिथे होतो. कारण मी कारसेवक आहे, राम सेवक आहे, असे उपमुख्यमंत्री सांगतात. माझा महत्त्वाचा परिचय रामसेवक आणि कारसेवक म्हणून आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. नुकताच त्यांनी यासर्वाचा पुरावा समोर आणला आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी नागपूरहून प्रकाशित होणार्‍या दै. नवभारतचे आभार मानले आहेत. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र त्यांनी शेअर केले आहे. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले असल्याचे फडणवीसांनी सांगितले. 

हेही वाचा :  Global Carbon Budget 2022: जगाचा विनाश केवळ 9 वर्षे दूर! हे बाबा वेंगाचे भाकीत नसून शास्त्रज्ञांचा रिपोर्ट

अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाल्याचे फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …