आई-वडिल नसलेल्या पुतणीला संभाळलं..वयात आल्यावर बनवलं वासनेची शिकार; 4 महिन्यांची गर्भवती

Ghaziabad Crime: जगभरात होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटनांपैकी बहुतांश प्रकार या घरातील व्यक्तीकडून होत असल्याचे वारंवार समोर येत असते. सामाजिक दबावामुळे या घटना समोर येत नाहीत. पण कितीही लपवलं तरी गुन्हा लपून राहत नाही, अखेर गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडतोच. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा प्रकार ऐकून नात्यावर काका-पुतणीच्या पवित्र नात्यावर विश्वास उडू शकतो. एखाद्या मुलाचे आई वडिल त्याच्या लहानपणी वारले तर मामा, काका सारखे जवळचे नातेवाईक मुलाचा संभाळ करतात. आई वडिलांसारखंच प्रेम देतात. लहानाचं मोठं करतात. स्वत:च्या पायावर उभं करतात. पण यांनीच जर आपल्या वासनेसाठी मुलांचा गैरफायदा घेतला तर? अशी गंभीर घटना गाझियाबादमध्ये घडली आहे. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

वयात आल्यावर वासनेची शिकार

या घटनेचील पीडित मुलगी ही शालीमार गार्डन येथे राहते. ती लहान असतानाच तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे काकाने तिचे पालनपोषण केले. मुलगी वयात आल्यावर काकाने तिला आपल्या वासनेची शिकार बनवलं. शाळेत तब्येत बिघडली म्हणून मुलगी घरी आली आणि डॉक्टरकडे गेली. त्यानंतर तिला जे समजलं त्याने तिच्या पायाखालची वाळू सरकली. मुलगी गर्भवती असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना तिच्या काकीला कळाली. तिला आपल्या पतीच्या कृत्यावर भयंकर संताप आला. पण पतीला शिक्षा मिळायला हवी यामुळे पीडितेच्या काकीने पुढे येऊन आपल्या पती विरोधात पोलीस तक्रार केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. 

हेही वाचा :  Baramati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : मुलगी की सून, बारामतीत कोण मारणार बाजी?

आठवीमध्ये शिकते विद्यार्थीनी 

आरोपी हा शालीमार गार्डन ठाणे क्षेत्रात आपल्या परिवारासोबत राहतो. त्याचा छोटा भाऊ आणि वहिनीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या मुलीला म्हणजेच पुतणीला त्याने दत्तक घेतले. तिचे पालनपोषण केले. आता मुलगी 14 वर्षांची झाली आणि आठवी इयत्तेत जाऊ लागली. 

विद्यार्थीनी 4 महिन्याची गर्भवती 

शुक्रवारी मुलगी शाळेत गेली होती. तिची तब्येत बिघडली होती. पोटात दुखत होतं. त्यामुळे अल्ट्रासाऊंड करण्यात आले. यानंतर तिच्या पोटात गर्भ वाढत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. घरात असणाऱ्या काकानेच गैरप्रकार केल्याचे मुलीने सांगितले. काका डिसेंबर 2023 पासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे समोर आले. 

जिवे मारण्याची धमकी

कोणाला सांगितलंस तर जिवे मारेन अशी धमकी त्याने दिली होती. आपण गर्भवती आहोत हे मुलीला माहिती नव्हते.  भीतीमुळे तिने ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. यानंतर काकीने शालीमार गार्डन पोलीस ठाण्यात जाऊन पतीविरोधात तक्रार दिली. 

आरोपीविरोधात लैंगिक अत्याचार आणि पॉस्को अंतर्गत कलम लावण्यात आले आहे. तसेच आरोपीला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्तांनी दिली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : राज्याच्या कोणकोणत्या भागांना पाऊस झोडपणार? कुठे देणार उघडीप?

Maharashtra Weather News : मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर जून महिन्यात हा पाऊस परतणार की दगा देणार? …

‘मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा’, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO

लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन सुरु आहे. दरम्यान अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर एक वेळ अशी …