आई लोकांच्या घरी जाऊन धुणीभांडी करते, पण लेकीने जिद्दीने मिळविले पोलिस दलात यश

Success Story : आपल्याकडे मेहनत करायची तयारी असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करत यशाची पायरी चढता येते. ओझर येथील मरिमाता गेट येथे राहणाऱ्या अपूर्वा वाकोडे हिने करून दाखवले आहे. तिची पोलिस भरतीत पुणे शहर पोलिस दलात वाहनचालक पदावर निवड झाली असून, ती मुलींमध्ये पहिली आली आहे.

अपूर्वाच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची,‌लोकांच्या घरी जाऊन धुणीभांडी करते. अपूर्वादेखील आईला या कामात मदत करते. काम करूनच तिने बी. कॉमचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने एका कंपनीच्या माध्यमातून तिने मोटार ड्रायव्हिंग क्लास पूर्ण केला होता.

या प्रशिक्षणानंतर तिने पोलिस वाहनचालक पदासाठी फॉर्म भरला होता. इतकेच नाहीतर, पुढे तिने दोन लहान भावांनाही शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहन दिले. तर अपूर्वाचा ज्या दिवशी पोलिस भरतीचा लेखी पेपर होता, त्याच दिवशी तिचे वडील नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. टेलरकाम करणारे राजू वाकोडे यांना पंधरा दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोक झाला होता. याही स्थितीत अपूर्वाने जिद्द न सोडता लेखी परीक्षा दिली. पेपर देऊन संध्याकाळी घरी पोहचताच वडिलांनी जगाचा निरोप घेतला. पण तिने आईच्या कष्टाची जाणीव ठेवली. अपूर्वा वाकोडे पोलिस भरती उतरली आणि नुसती पासच झाली नाही, तर पुणे शहर पोलिस दलात ती मुलींमध्ये प्रथम आली.

हेही वाचा :  असम राइफल्स मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती Assam Rifles Bharti

मित्रांनो, जिद्द आणि चिकाटी, मेहनत करण्याची तयारी हे त्रिसूत्री असेल तर यश नक्कीच मिळते. पण या प्रवासात खचून गेले तर चालणार नाही.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …