Hruta Durgule : ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’मध्ये ऋता दुर्गुळे अव्वल 

Hruta Durgule : ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून ऋता दुर्गुळेला ओळखलं जाते. ऋताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते.  झी टॉकीज वाहिनीने महाराष्ट्राचा पॉप्युलर फेस ऑफ द इयर  या विभागातून ऋताचं नाव जाहीर केलं आहे. झी टॉकीज वाहिनीच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यातील सर्वात लोकप्रिय चेहरा या पुरस्काराच्या रूपाने  प्रेक्षकांची पसंती कायम स्पेशल राहील असं म्हणत ऋताने हा आनंद साजरा केला आहे.  

“महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? “हा पुरस्कार सोहळा घेऊन यावर्षी पुन्हा एकदा झी टॉकीज ही वाहिनी रसिकांच्या भेटीला आली आहे. गेल्या वर्षभर प्रदर्शित झालेल्या सिनेमांमधून विविध बारा विभागासाठी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ दि इअर, फेव्हरेट अभिनेता, अभिनेत्री, खलनायक, सहाय्यक अभिनेता , सहाय्यक अभिनेत्री, फेव्हरेट सिनेमा, गायक, गायिका, गाणं, संगीतकार, दिग्दर्शक आणि स्टाईल आयकॉन अशा विभागांचा समावेश आहे. झी टॉकीज वाहिनीतर्फे दरवर्षी जाहीर होणाऱ्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. या पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या कलाकारांमधून प्रेक्षकच त्यांच्या पसंतीची मोहर उमटवत असतात. 

हेही वाचा :  Lalit Prabhakar : ललित प्रभाकरचा टेरर अंदाज

छोट्या पडद्यावर मोठी प्रसिद्धी  मिळवणारी अभिनेत्री ऋता दुर्गळे सरत्या वर्षात मोठ्या पडद्यावरही झळकली होती. ऋताने टाइमपास 3 या पहिल्याच सिनेमात साकारलेल्या टपोरी गर्ल पालवीने अक्षरशा धमाल केली. दुर्वा या मालिकेतून तिने अभिनयाला सुरूवात केली. फुलपाखरू, मन उडू उडू झालं या तिच्या मालिकाही गाजल्या. दादा एक गूड न्यूज आहे या नाटकातूनही ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.फुलपाखरु या मालिकेतून ऋता प्रसिद्धीझोतात आली. 

इन्स्टाग्रामवर ऋताचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. इन्स्टाग्रामवर 25 लाख फॉलोअर्स असलेली ऋता ही एकमेव मराठी अभिनेत्री आहे असं म्हटलं जातं. अनेक कार्यक्रमांमध्ये ऋता ची स्टाईल फॉलो केली जाते. दरम्यान, ऋताने दोनच दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत आजचा दिवस खास असल्याचे म्हटले होते. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तर्क वितर्क लढवले होते. अखेर तिने ती पोस्ट का केली होती हे आजच्या बातमीतून चाहत्यांच्या लक्षात आलं आहे.  “आजचा दिवस फारच खास आहे”, असे कॅप्शन तिने एक फोटो शेअर करून दिले होते.  

“झी टॉकीज या वाहिनीतर्फे महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून प्रेक्षकांनी पसंती दिली हेच माझ्या अभिनयाचं सार आहे असं मला वाटतं . कलाकार म्हणून प्रत्येकालाच कोणतंही माध्यम हे खुणावत असतं. मी पण कधीच असं ठरवलं नव्हतं की मालिकांमध्ये काम करायचं की सिनेमात रमायचं की रंगभूमीवर स्वतःला सादर करायचं. पण जसजशी मला संधी मिळत गेली तसं मी त्या संधीचं सोनं करायचं इतकच ठरवलं होतं. मालिकांनी मला ओळख दिली. नाटकाने माझ्यातील रंगभूमीवरच्या अभिनयाला लागणारा आत्मवश्विास दिला. प्रत्येकालाच आपल्या आयुष्यातील पहिली गोष्ट ही कायम खास असते आणि माझ्यासाठी झी टॉकीज वाहिनी तर्फे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून मिळलेली पुरस्काराची  भेट आयुष्यभर एक स्पेशल पुरस्कार बनवून राहील, अशा भावना ऋताने व्यक्त केल्या आहेत.  

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …