मोबाईलमधलं ‘हे’ अॅप सांगणार रस्त्यावरच्या स्पीड कॅमेराचं लोकेशन; पाहा कसं वापराल

Speed Camera Alert : मागील काही वर्षांमध्ये भारतात वाहनांसंबंधीचे नियम इतके बदलले की खऱ्या अर्थानं बेशिस्त पद्धतीनं वाहनं चालवणाऱ्यांवर चाप बसला. पण, अनावधानानं किंवा कोणत्या दुसऱ्या कारणानं वाहनाचा वेग ओलांडला आणि त्या रस्त्यावर तितकी वेगमर्यादा नसेलच तर, एक कॅमेरा तुमचा फोटो टीपतो आणि तो तुमच्याच नोंद असणाऱ्या Mobile Number वर पाठवून चलान आणि दंडात्मक रकमेची माहिती तुम्हाला देतो. 

नकळतपणे अशी अनेक चलानं अनेकांच्या नावे आजवर निघाली असतील. किंबहुना बऱ्याच वाहनधारकांसाठी ऑनलाइन चलान ही एक मोठी समस्या ठरत आहे. कारण रस्त्यावर असणाऱ्या छुप्या कॅमेरासमोरून तुमचं वाहन केव्हा भरधाव वेगात पुढे जातं हे तुमच्याही लक्षात येत नाही. अनेकदा रस्ता नवा असल्यामुळं तेथील वेगमर्यादेची आपल्याला कल्पना नसते, त्यामुळंही हे चलान निघतं. पण, आता मात्र असं होणार नाही. 

मोबाईल अॅप तुम्हाला करणार सतर्क… 

आता चलान निघण्याचा धोका कमीच आहे, कारण मोबाईलमध्ये असणारं एक अॅप तुम्हाला सतर्क करणार आहे. हे अॅप आहे Google Map आणि त्यातलं तुम्हाला सावध करणारं फिचर आहे ‘स्पीड कैमरा अलर्ट’.

हे फिचर तुम्हाला त्या ठिकाणांविषयी माहिती देतं जिथं स्पीड कॅमेरा लावण्यात आले आहेत. इतकंच नव्हे तर, सध्याच्या घडीला तुम्ही ज्या रस्त्यावरून प्रवास करत आहात तिथं वेगमर्यादा काय आहे हेसुद्धा हा कॅमेरा तुम्हाला सांगणार आहे. या फिचरचा वापर करण्यासाठी तुम्ही फक्त मोबाईलमध्ये असणाऱ्या गुगल मॅप या अॅपमध्ये Speed Camera Alert सुरु करणं गरजेचं आहे. 

हेही वाचा :  Apple Store : अखेर भारतातील पहिलं-वहिलं​ॲपलस्टोर मुंबईत सुरु, जाणून घ्या या स्टोरबद्दलच्या काही खास गोष्टी

कसं अॅक्टिव्ह करावं हे फिचर? 

– मोबाईलमध्ये Google Map सुरु करा
– स्क्रीनच्या खालच्या भागामध्ये More आयकॉनवर क्लिक करा. 
– आता Settings वर क्लिक करा. 
– पुढे Driver Options वर क्लिक करा. 
– आता Speedometer वर टॅप करा. 
– शेवटी स्पीडोमीटर सुरु करा असा पर्याय तुम्हाला दिसेल, त्यावर टॅप करा आणि सावधगिरीनं वाहन चालवा. 

हे फिचर अॅक्टिव्ह होताच गुगल मॅप वाहन चालतांना जिथं जिथं सीसीटीव्ही आहेत त्याबाबत सतर्क करणार आहे. वाईट वातावरणामध्येही ही फिचर उत्तमरित्या काम करणार आहे. हवामान खराब असताना वाहनचालकांना कायमच सावधगिरी बाळगावी लागते. परिणामी वाईट हवामानामध्ये वाहनाची वेगमर्यादा काय असावी याबाबतही हे अॅप सतर्क करणार आहे. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पार्ट टाईम जॉब ऑफर, 10 हजार गुंतवून 20 लाख कमवले अन्…; 61 लाखांच्या फसवणुकीची गोष्ट

Cyber Crime Part Time Job Offer: सायबर गुन्हेगारीचे रोज नवे नवे प्रकार समोर येत आहेत. …

लोणावळ्यात पछाडलेली Rolls Royce कार? 17 वर्षीय तरुणीची हत्या अन्…

Haunted Rolls Royce of Lonavala: भुताटकीचे कथित अनुभव आलेल्या जागा किंवा पछाडलेल्या जागा म्हणून कुप्रसिद्ध …