आजपासून सुरु होणार हॉकी विश्वचषकाचा थरार, भारताचा सलामीचा सामना स्पेनशी, कधी, कुठे पाहाल सामना?

India vs Spain Hockey World Cup 2023 Live Streaming : भारतीय हॉकी संघ (Team India) आजपासून आपल्या हॉकी विश्वचषकाची (Hockey World Cup 2023) सुरुवात करणार आहे. भारत सलामीचा सामना स्पेन संघाविरुद्ध (India vs Spain) खेळणार आहे. दरम्यान यंदा ही विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केली जात असल्याने भारत स्पर्धा जिंकेल अशी आशा फॅन्सना आहे. यंदा भारत दमदार खेळाडूंना घेऊन स्पर्धेत उतरत आहे. दरम्यान भारताच्या आज स्पेनविरुद्धच्या सामन्यासंबधी माहिती जाणून घेऊ…

कधी होणार सामना?

भारत विरुद्ध स्पेन हा हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारताला पहिला सामना आज अर्थात 13 जानेवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायकांळी 7 वाजता सामना खेळवला जाईल. 

कुठे आहे सामना?

news reels

आजचा भारत विरुद्ध स्पेन हा सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध स्पेन या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.  

कसे आहेत दोन्ही संघ?

हेही वाचा :  Odisha Train Accident: ओडिशा ट्रेन अपघानंतर गौतम अदानींची मोठी घोषणा! म्हणाले, "ओडिशा रेल्वे दुर्घटनेमुळे आम्ही..."

भारतीय संघ : अभिषेक, सुरेंदर कुमार, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, जर्मनप्रीत सिंग, मनदीप सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), ललित उपाध्याय, कृष्ण पाठक, निलम संजीप एक्सेस, पीआर श्रीजेश, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग, वरुण कुमार, आकाशदीप सिंग, अमित रोहिदास (उपकर्णधार), विवेक सागर प्रसाद आणि सुखजीत सिंग.

स्पेनचा संघ: आंद्रियास रफी, अलेजांद्रो अलोन्सो, सीझर क्युरिएल, झेवी गिस्पर्ट, बोर्जा लॅकाले, अल्वारो इग्लेसियास, इग्नासियो रॉड्रिग्ज, एनरिक गोन्झालेझ, जेरार्ड क्लॅप्स, आंद्रियास रफी, जॉर्डी बोनास्ट्रे, जोकीन मेनिनी, मारियो मिरिल, मार्क रीलेस, मार्क रीलेस, मार्क रेन, सी. मार्क रेकासेन्स, पॉ क्युनिल आणि मार्क विझकैनो.


हे देखील वाचा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …