एसआरए योजनेमध्ये मिळालेले घर विकताय? ही अट माहितीये का?

Mumbai SRA Homes: एसआरए योजनांमध्ये (SRA Scheme) मिळालेले घर विकायचे झाल्यास त्यासाठी काही अटी शर्थीदेखील पाळाव्या लागतात. झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणाकडून मिळालेली घरे अनेकदा घर मालकांकडून आर्थिक नफ्यासाठी ही घरे विकली जातात. एसआरएची घरे विकण्यासाठी पूर्वी 10 वर्षांची अट होती. मात्र, आता ही घरे 5 वर्षांनंतर विकता येणार आहेत. मात्र, तरीही एसआरएची घरे विकण्याकरिता एनओसी आवश्यक असते. हीच अट शिथिल करता येईल का याबाबत विधान परिषदेत चर्चा झाली. मात्र, ही अट शिथिल करता येणार नाही, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांवी दिली आहे. 

विधान परिषदेत भाई गिरकर यांनी 1995 मध्ये सुरू झालेल्या एसआरए योजनेला 30 वर्षे झाली असून घर विकताना आवश्यक असलेली एनओसीची अट काढून टाकावी, अशी मागणी केली. मात्र, यावर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी ही अट काढून टाकता येणार नाही, हे स्पष्ट केलं आहे. एसआरएचे घर विकताना एनओसी घ्यावीच लागेल, हा न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळं ही अट शिथील करता येणार नाही.

अतुल सावे यांनी दिलेल्या माहितीनुसार,  सुरुवातीला ही अट 10 वर्षांची होती. मात्र त्यात शिथिलता देत एक लाखावरुन ती 50 हजार करण्यात आली आहे. घर नातेवाईकांच्या नावावर करायचे झाल्यास ती कार्यवाही 200 रुपयांत होते. घर विक्री करण्यासाठी एनओसी ही ऑनलाइन दिली जाणार आहे. अर्ज केल्यानंतर फक्त 45 दिवसांतच एनओसी दिली जाणार. जर एखाद्या झोपडीधारकाचे निधन झाल्यास त्याच्या वारसाने वारसाहक्क प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांनाही एनओसी दिली जाणार आहे, अशी माहिती सावे यांनी दिली आहे.

हेही वाचा :  Maharashtra Budget 2023: फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

दरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत (SRA) पुनर्वसन करण्यात आलेली घरे यापुढे पाच वर्षांनी विकता येणार आहेत. राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत पुनर्वसन करण्यात येणारी घरे यापूर्वी 10 वर्षांनंतर विकण्याचा नियम होता. हा नियम बदलून 5 वर्षे करण्यात आला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणी संकट दूर होणार; वैतरणा, भातसा, बारवी, खडकवासलासह प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

Heavy Rain In Maharashtra : मुंबईकरांवरचं पाणी संकट दूर होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा …

सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर; कोकणात तुफान पाऊस

Heavy Rain In Maharashtra : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडत आहे. कोकणात पावासाने धुमशान …