Happy Mother’s Day: देवीचे नाही तर आईचे मंदिर! 51 फूटांची मूर्तीही बसवणार, मुलाचे अनोखे मातृप्रेम

Happy Mother’s Day 2023: जगभरात मदर्स डे जल्लोषात साजरा केला जात आहे. मुलं कितीही मोठं झालं तरी आईसाठी लहानच असतं. प्रत्येकजण आपल्या आईला मदर्स डे च्या शुभेच्छा देत दिला भेट वस्तू देऊन आपले मातृप्रेम व्यक्त करत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये एका व्यक्तीने अनोख्या पद्धतीने आपले मातृप्रेम व्यक्त केले आहे. सर्वजण देव देवातांची मंदिरे बाधताता. मात्र, आंध्र प्रदेशमध्ये राहणारे सनापाल श्रवणकुमार हे आपल्या आईचे मंदिर बांधत आहेत. या मंदिरात ते आईची 51 फूटांची भव्य मूर्ती देखील स्थापित करणार आहेत.  

आपल्या लेकरांवर निस्वार्थीपण प्रेम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई. म्हणूनच तर म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. पोटात गर्भ वाढायला लागल्यापासून ते बाळाचा जन्म होईपर्यंत आई असंख्य वेदना सहन करते. बाळाच्या जन्मानंतरही आई आपल्या मुलासाठी झटत राहते. सर्व सुखं आपल्या लेकराला मिळावीत असी प्रत्येक माईलीची इच्छा असते. मुलांवर चांगले संस्कार करुन त्यांना यशस्वी तसेच सुस्कृंत व्यक्ती बनवण्याचे काम आई करत असते. आई आणि मुलाचे नातचं वेगळ असतं. यामुळे आपल्या आईचा सांभाळ करणे, तिच्याशी प्रेमाने वागणे हे देखील मुलांचे कर्तव्य असते. 

हेही वाचा :  लातूरच्या मंदिरात नंदी दूध पीत असल्याचा दावा, व्हायरल व्हिडीओचे हे आहे शास्त्रीय कारण!

मातृदिनी आईला अनोखी भेट

आपल्याला हे विश्व दाखवणाऱ्या आपल्या आई प्रती कृतज्ञता कशा प्रकारे व्यक्त करावी असा प्रश्न सनापाल श्रवणकुमार यांना पडला होता. याच विचारातून त्यांनी आपल्या आईचे भव्य मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. श्रवणकुमार हे ‘आई अनुसिया देवी’ यां नावाने आपल्या आईचे मंदिर बांधत आहेत. 

आईच्या स्मरणार्थ मंदिर

श्रवणकुमार हे आपल्या आईच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधत आहेत. 2008 मध्ये आई अनुसिया देवी यांचे निधन झाले. श्रवणकुमार यांचा हैदराबादमध्ये व्यवसाय आहे. आईमुळेच आपण आज इतके यशस्वी आहोत. आईच्या निधनानंतर  आईची स्मृती सदैव अखंड राहावी, असा विचार करून त्यांनी आईचे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. 

मंदिर उभारण्यासाठी 10 कोटींचा खर्च

चिमलवलसा येथे आपल्या आईचे भव्य मंदिर उभारत आहेत. यासाठी त्यांना 10 कोटींचा खर्च आला आहे. या मंदिरासाठी संगमरवरी दगडाचा वापर करण्यात आला आहे. या मंदिरात ते आई अनूसिया देवी यांची 51  फूटांची भव्य मूर्ती देखील स्थापित करणार आहेत. या मंदिराचे 70 टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच हे मंदिर खुले होणार आहे. 

हेही वाचा :  पीएनबी बॅंकेत हजारो पदांची भरती, कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …