गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी खुशखबर, आणखी 52 ट्रेनची घोषणा, पाहा टाईमटेबल

Konkan Railway Special Train : गणपती उत्सव (Ganpati Utsav) हा कोकणातील (Konkan) चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याच विषय. यंदा सप्टेंबर महिन्यात बाप्पाचं आगमन होणार असून चाकरमनी आतापासून कोकणात जाण्याचं नियोजन करतात. बाप्पाच्या आगमनासाठी भाविक (Devotee) तयारीला लागलेत. गावी जाण्याच्या ओढीने ट्रेन, बस किंवा खासगी वाहतूकीने चाकरमनी सुट्टी टाकून कोकणात पोहोचतो. यात ट्रेन (Tain) प्रवासाला जास्त प्राधान्य दिलं जातं. पण ट्रेनला प्रचंड गर्दी होत असल्याने दरवर्षीच प्रवाशांचे हाल होतात. यंदा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाटी रेल्वे प्रशासनाने नियोजन केलं आहे. चाकरमन्यांना कोकणात जाताना सोईस्कर प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेने 156 विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला होता. 

यात आता आणखी 52 ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे आता एकूण 208 ट्रेनची सेवा कोकणात प्रवाशांना मिळणार आहे.  52 ट्रेनमध्ये दिवा-चिपळूण दरम्यान आणखी  36 मेमू स्पेशल आणि मुंबई-मंगळुरु दरम्यान 16 स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत. 

असं आहे स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक

अ) दिवा-चिपळूण मेमू विशेष सेवा – 36 फेऱ्या
01155 मेमू दिवा इथून 13.09.2023 ते 19.09.2023 आणि 22.09.2023 ते 02.10.2023 पर्यंत दररोज 19.45 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 01.25 वाजता चिपळूणला पोहोचेल.

हेही वाचा :  कोरियन आणि जपानी मुलींच्या काचेसारख्या त्वचेचे रहस्य तुमच्या स्वयंपाकघरात

01156 मेमू चिपळूण इथून 14.09.2023 ते 20.09.2023 आणि 23.09.2023 ते 03.10.2023 पर्यंत दररोज 13.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 19.00 वाजता दिवा इथं पोहोचेल.

थांबे: पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी.

ब) मुंबई आणि मंगळुरू जंक्शन विशेष सेवा – 16 सहली

01165 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 15.09.2023, 16.09.2023, 17.09.2023, 18.09.2023, 22.09.2023, 23.09.2023, 23.09.2023, आणि 23.09.2023 -22.15 वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन 17.20 वाजता दुसऱ्या दिवशी पोहोचेल.

 01166 स्पेशल मंगळुरु जंक्शन 16.09.2023, 17.09.2023, 18.09.2023, 19.09.2023, 23.09.2023, 24.09.2023,30.09.2023 आणि 01.10.2023 ला 13.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल.

 थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा  , मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड ब्यंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल आणि ठोकूर

डब्यांची रचना : 1 AC-2 टियर, 2 AC-3 टियर, 10 स्लीपर क्लास, 5 जनरल सेकंड क्लास आणि 2 जनरल सेकंड क्लास कम गार्डची ब्रेक व्हॅन.

हेही वाचा :  महाराष्ट्रातील 'या' गावात गाढविणीच्या एक लीटर दूधाचा भाव चक्क 20 हजार, फायदे वाचून थक्क व्हाल!

 क) आरक्षण:
 विशेष गाड्यांसाठी बुकिंग क्र.  01165 03.07.2023 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी  www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीचा विकास जोरात! AI मुळे उसाचे उत्पादन 30 टक्क्यांनी वाढले; देशातील पहिलाच प्रयोग

कैलास पुरी, झी 24 तास पुणे: बारामतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करत ऊस उत्पादन वाढवणारा यशस्वी …

बाथरूममध्ये ड्रग्जचे सेवन; पुण्यातील FC रोडवर असलेल्या हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

Pune Crime News :  पुणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते इथे होत असलेल्या ड्रग्ज …