Gold Silver Price: आज सोनं-चांदी स्वस्त! लग्नसराईच्या मोसमात ग्राहकांसाठी मोठी अपडेट

Gold Sliver Price Today: मार्च आणि एप्रिलमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. आता मात्र सोन्याचे दर हे घसरताना दिसत आहेत. यंदाही लग्नसराईचा मोहोल (Gold Rates Today) आहे. त्यामुळे लग्नखरेदीसोबतच सोन्याचे दागिने खरेदी करण्याकडेही लग्नमंडळींना (24K Gold Price) अनिवार्य असते. सोबतच सोन्याकडे गुंतवणूक म्हणूनही पाहिलं जातं. मे महिन्यातही सोन्याचे भाव हे घसरल्याचे दिसत आहेत. आज सोन्याचे दर हे 24 कॅरेट सोन्यासाठी 61,850 रूपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोनं हे 56,700 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके आहे. 

सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार दिसतो आहे. त्याचसोबत अद्यापही सोनं हे 60 हजार पारच आहे. सोन्याच्या किंमतींमध्ये आज फारशी घट झालेली नाही सोबतच फारशी वाढही झालेली नाही. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडे उत्तम संधी आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर हे वाढण्याची (Gold Price Hike) शक्यता आहे. काही विश्लेषकांच्या मते, सोन्याचे दर हे 70 हजार पारही जाऊ शकतात परंतु उद्याप इतकी मोठी वाढ झाली नसून ग्राहकांना तात्पुरता (Gold Price Prediction) तरी दिलासा मिळालेला आहे. (Gold Silver Price today at the eve of the wedding season gold and sliver prices shrinks know the latest price)

हेही वाचा :  तरुणी रस्त्यात व्हिडीओ रेकॉर्ड करत असतानाच दुचाकीवरुन दोन तरुण आले अन्...; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

काय सांगतो दहा दिवसांचा आकडा? 

1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं सुट्टीच्या दिवशी सोनं खरेदीसाठीही अनेकांनी बाजारांना भेट दिली असेलच. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर हे 60,760 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके होते. त्यानंतर दुसऱ्याही दिवशी हा दर सारखाच राहिला. त्यानंतर सोन्याच्या दरात सलग तीन दिवस वाढ झालेली पाहायला मिळाली.

गुडरिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, 3 मे रोजी सोन्याचे दर हे 880 रूपयांनी वाढले. त्यानंतर 4 मे रोजी ही दरवाढ 540 रूपये इतकी होती. तर 5 मे रोजी ही किंमत 220 रूपये इतकी होती. त्यानंतर दोन दिवस सोन्याच्या दरात 760 रूपयांनी घट झाली, दुसऱ्या दिवशीही ही किंमत 10 रूपयांनी घटली परंतु त्यानंतर दोन दिवस सोन्याच्या दरात 100 रूपये आणि 120 रूपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली. आज मात्र सोन्याच्या दरात फारशी वाढ नाही. 

हेही वाचा – अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आमिर खाननं गाठलं नेपाळचं विपश्यना केंद्र?

आज चांदीचा भाव किती आहे? 

गुडरिटर्न्सनुसार आज चांदीच्या भावातही मोठी घसरण (Sliver Price) झाल्याची पाहायला मिळते आहे. आज चांदी ही 78 हजार रूपये प्रति किलो इतके आहे. आज चांदीच्या भावात 100 रूपयांनी घट झाली आहे. त्यामुळे आज जर का तुम्ही सोनं किंवी चांदी खरेदी करायला जाणार असाल तर तुमच्यासाठी आज खरेदीची सुवर्णसंधी आहे.     

हेही वाचा :  फ्री सिगारेट दिली नाही म्हणून राग अनावर; हॉटेल चालकाच्या डोक्यात कोयत्याचे सपासप वार



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …