मोबाईल कॉलिंगबाबत 1 मेपासून नवा नियम! आगामी कॉल आणि एसएमएसमध्ये मोठे बदल

Mobile Calling New Rule : मोबाईल कॉलिंगबाबत नवीन नियम लागू होणार आहेत. त्यामुळे आता नवे बदल पाहायला मिळतील. ट्राय (TRAI) एक फिल्टर सेट करत आहे. त्यानंतर बनावट कॉल्स आणि एसएमएसला प्रतिबंध लागणार आहे. यामुळे ग्राहकांची अनोळखी कॉल्स आणि अनावश्यक मेसेजपासून सुटका होणार आहे. अनेक दिवसांपासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) काही नियम बदलण्याचा विचार करत आहे. त्याला आता मुहूर्त स्वरुप मिळाले आहे. 1 मे 2023 पासून फोनमधील बनावट कॉल आणि एसएमएस थांबण्यास मदत होणार आहे. त्यासाठी नवीन नियमांनुसार, ट्राय एक फिल्टर सेट करत आहे. यानंतर यूजर्स अनोळखी कॉल्स आणि गरजेचे नसणाऱ्या मेसेजपासून सुटका होणार आहे.

नवीन नियम 1 मेपासून लागू होणार

ट्रायने दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या फोन कॉल आणि संदेश सेवांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्स स्पॅम फिल्टर बसविण्याचे आदेश जारी केले होते. हे फिल्टर फेक कॉल्स आणि मेसेजपासून यूजर्सची सुटका करण्यात मदत करणार आहे. या नवीन नियमानुसार, फोन कॉल्स आणि मेसेजशी संबंधित सर्व टेलिकॉम कंपन्यांना 1 मे 2023 पूर्वी फिल्टर बसविण्यात सांगण्यात आले होते. आता याची अलमबजावणी करण्यासाठी ट्रायने पुढाकार घेतला असून पुढील महिन्यापासून हे नवे नियम लागू होणार आहेत.

हेही वाचा :  Truecaller बद्दल तुम्हाला 'ही' गोष्ट माहित आहे? जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

काही मोबाईल कंपन्यांनी ही सुविधा सुरु केलेय, आता…

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नवीन नियम लागू करण्यापूर्वीच एअरटेलने अशा AI फिल्टरची सुविधा आधीच जाहीर केली आहे. तर Jio ने देखील या नवीन नियमानुसार आपल्या सेवांमध्ये AI फिल्टर्स बसवण्याची तयारी जाहीर केली आहे. सध्या याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही. मात्र, 1 मे 2023 पासून भारतात AI फिल्टर्सचे अ‍ॅप्लिकेशन सुरु होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यापुढे प्रमोशन कॉल्सवर बंदी असणार

ट्रायने फेक कॉल आणि मेसेज रोखण्यासाठी नियम बनवण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत TRAI ने 10 अंकी मोबाईल नंबरवर केले जाणारे प्रमोशनल कॉल थांबवण्याची मागणी केली आहे. याशिवाय TRAI ने कॉलर आयडी फीचर देखील आणले आहे, जे कॉलरचे नाव आणि फोटो दाखविण्यास मदत करेल. दूरसंचार कंपन्या Airtel आणि Jio देखील Truecaller अ‍ॅपशी बोलणी करत आहे. परंतु ते कॉलर आयडी वैशिष्ट्य लागू करण्यापासून ते प्रयत्न करत आहेत. कारण यामुळे गोपनीयता भंग होण्याची समस्या उत्पन्न होऊ शकते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …