Forbs World Ranking 2022 : मुकेश अंबानींचं सर्वात मोठं यश, टॉप 100 मध्ये Reliance कंपनी ‘या’ स्थानावर

Mukesh Ambani Reliance Industries India Best Company : दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambanis) यांच्याबद्दल आताची सर्वात मोठी बातमी…मुकेश अंबानी यांच्यासाठी हे वर्ष भाग्यवान ठरलं आहे. सरत्या वर्षां पहिले फोर्ब्सने (Forbes ranking) जगातील सर्वोत्कृष्ट इंडस्ट्रीजची यादी जाहीर केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वोत्कृष्ट कंपनीमधील एक कंपनी ठरली आहे. मुकेश अंबानींचं हे सर्वात मोठं यश आहे. फोर्ब्सने जगातील सर्वोत्कृष्ट नियोक्ता रँकिंग 2022 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) जगातील 20 सर्वोत्तम कंपन्यांमध्ये सहभागी झाली आहे.  

टॉप 100 मध्ये  Reliance कंपनी ‘या’ स्थानावर

रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील 20 व्या स्थानावर आहे (forbes top 20 employers reliance), तर भारतात पहिल्या स्थानावर आहे. मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज ही महसूल, नफा आणि बाजार मूल्यानुसार भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने फोर्ब्स ग्लोबल रँकिंगमध्ये (Forbes Global Ranking) पहिले स्थान मिळवले आहे. त्यापाठोपाठ अमेरिकेचा मायक्रोसॉफ्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर आयबीएम, अल्फाबेट आणि अॅपलचा क्रमांक लागतो. जगातील सर्वोच्च कंपन्या अमेरिकेत आहेत. या यादीतील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकन कंपन्या सतत दुसऱ्या ते 12व्या स्थानावर आहेत. म्हणजे सॅमसंग प्रथम स्थानावर आहे, त्यानंतर 2 ते 12 अमेरिकन कंपन्यांचा समावेश आहे. जर्मनीची ऑटोमोबाईल कंपनी BMW 13 व्या स्थानावर आहे. जगातील सर्वात मोठी रिटेलर अॅमेझॉन 14 व्या आणि फ्रेंच स्पोर्ट्स कंपनी डेकॅथलॉन 15 व्या स्थानावर आहे. (mukesh ambanis reliance big news and Forbs World Ranking 2022 nmp)

हेही वाचा :  अंबानींची सून शोभेल इतकी श्रीमंत आहे राधिका मर्चंट; तिच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

भारतातील एकमेव कंपनी

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जगातील 100 कंपन्यांच्या यादीत रिलायन्सशिवाय दुसरी कोणतीच कंपनी नाही. HDFC बँक 137 व्या स्थानावर आहे. बजाज (173वे), आदित्य बिर्ला ग्रुप (240वे), हिरो मोटोकॉर्प (333वे), लार्सन अँड टुब्रो (354वे), आयसीआयसीआय बँक (365वे), एचसीएल टेक्नॉलॉजीज (455व्या), स्टेट बँक ऑफ इंडिया (499व्या), अदानी एंटरप्रायझेस (547व्या) आणि त्यात इन्फोसिस (668व्या) ची नावे आहेत. 

Reliacne Industries :

एवढ्या मोठ्या यशानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज अजून एका मोठ्या कंपनीसोबत करार करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliacne Industries Ltd.) सुमारे 500 दशलक्ष युरो (रु. 4,060 कोटी) च्या अंदाजे डीलमध्ये जर्मन रिटेल कंपनी मेट्रो कॅश अँड कॅरी इंडियाचा भारतातील व्यवसाय विकत घेण्याच्या तयारीत आहे. 

METRO Cash & Carry :

करारामध्ये मेट्रो कॅश अँड कॅरीच्या मालकीच्या 31 घाऊक वितरण केंद्रे, जमीन बँका आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे, असं म्हटलं जातं आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मेट्रो यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती आणि गेल्या आठवड्यात जर्मन कंपनीने रिलायन्स रिटेलच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली.

हेही वाचा :  Budget 2024 : निर्मला सीतारमण मारणार अर्थसंकल्प सादर करण्याचा सिक्सर; स्वतःच्या नावावर नोंदवले जबरदस्त रेकॉर्ड

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …

लोकांना हसवून करा ‘इतकी’ कमाई! स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअरची सर्व माहिती

Career in Standup Comedy: तुम्हाला लोकांना हसवायला आवडतं? तुम्ही लोकांना हसवू शकता? तुम्हाला लाफ्टर शो …