जगात पहिल्यांदाच होतंय असं! महिला करणार एआय टेक्नोलॉजीसोबत लग्न

Woman AI Holographic Partner : विवाह बंधनात अडकणं हे जगातील पवित्र नात्यांपैकी एक मानलं जातं. यामध्ये 2 पार्टनर आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचे वचन देतात. आतापर्यंत आपण अनेक प्रकारचे विवाह पाहिले आहेत. स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन विवाह करतात, स्त्री आणि स्री तसेच दोन पुरुष एकत्र येऊन विवाह होणे हेदेखील आता  सर्वसामान्य आहे. पण आता जग पहिल्यांदाच एका वेगळ्या लग्नाचे साक्षीदार होणार आहे. एका महिलेने पुरुष किंवा स्त्रीसोबत नव्हे तर टेक्नोलॉजीसोबत लग्न करण्याचा प्लान केलाय. 

आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग सुरु झाले आहे. एआयच्या मदतीने जग वेगाने पुढे चालले आहे. एआय आपल्या जिवनात क्रांतीकारी बदल घडवून आणत आहे. पण कोणी एआय होलोग्राफीक पार्टनरसोबत लग्न केलं तर? हो. असा सोहळा लवकरच पार पडणार आहे. माणसाने तंत्रज्ञानाशी लग्न करण्याचा पहिला प्रसंग जग पाहणार आहे. 

एका महिलेने एआय होलोग्राफिक पार्टनरसोबत लग्न करण्याचे प्लानिंग केलंय. स्पॅनिश कलाकार एलिसिया फ्रेमिसने हा निर्णय घेऊन जगाला धक्का दिलाय. तिने आपल्या एआय होलोग्राफिक पार्टनरसोबत लग्नाची घोषणा केली आहे. साध्या भाषेत समजून घ्यायचं तर कोणत्या मानव आणि तंत्रज्ञानामध्ये होणारे हे पहिलेच लग्न आहे. 

aicouncillor नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याबद्दल माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये एलिसिया फ्रेमिस आपल्या एआय होलोग्राफिक पार्टनरसोबत बसलेली दिसत आहे. ती आपल्या या लाडक्या पार्टनरसोबत बोलत असते, जेवत असते आणि खूप साऱ्या गप्पा मारताना आणि त्याच्यावर प्रेम करताना दिसते. 

हेही वाचा :  चेकवर सही करताना 'या' चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

स्पॅनिश कलाकार एलिसिया फ्रेमिस आणि एआय होलोग्राफीकचे लग्न रॉटरडॅममध्ये होणाऱ्या एका सोहळ्यात होईल. मानवी आणि तंत्रज्ञानाच्या नात्याचे हे मिश्रण असेल. या जोडप्याला हायब्रीड कपल नावाने ओळखले जाईल. 

समोर आलेल्या वृत्तानुसार स्पॅनिश कलाकार एलिसियाने आपला एआय पार्टनर तिच्या आधीच्या रिलेशनशिप्समधील डेटाच्या आधारे तयार केला आहे. तिने आपल्या या आयुष्यभराच्या जोडीदाराला AiLex असे नाव दिले आहे. 

या व्हिडीओवर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक तिच्या या निर्णयाचे कौतुक करत आहेत तर अनेकजण तिची खिल्ली उडवत तिला ट्रोलदेखील करत आहेत. या पोस्टला आतापर्यंत 19 हजारच्यावर लाईक्स मिळाले आहेत. तसेच प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …