Breaking News

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं आणि प्रेमाची व्याख्या ज्यासमोर अपुरी ठरते, ते नातं म्हणजे बाप आणि लेकाचं नातं. आई मुलाचं नातं सर्वांना दिसतं, अनेक लेख, कथा, कांदबऱ्या यावर लिहिल्या गेल्यात. मात्र, बापावर लिहिलेलं लिखाणं शोधणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्याचा प्रकार. असं म्हणतात, काही व्यक्ती लांब गेल्यावर त्याची किंमत कळते. त्याचा प्रत्यय घरापासून लांब राहणाऱ्या मुलाला किंवा मुलीला येत असावा. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. (Fathers Day 2024 Father heartwarming viral video that sees off his son makes people teary eyed trending video)

मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांच्या आई-वडिलांसाठी ती लहानच असतात. त्यामुळे घरापासून लांब राहणाऱ्या मुलांसाठी त्यांचा जीव तळमळत असतो. वरून कठोर असलेला बाप आतून किती हळवा असतो, याची प्रचिती दर्शविणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. शिक्षणानिमित्त किंवा कामानिमित्त एकमेकांपासून लांब राहिलेला एक मुलगा पुन्हा परतीच्या मार्गावर जात असतो. त्यावेळी त्याचे वडील थंडीत त्याला सोडवायला येतात.

वडील मुलाला सोडवायला रेल्वे स्टेशनवर आले. त्यावेळी त्यांनी आपल्या लाडक्या लेकाला ट्रेनमध्ये बसवलं. वडील प्लॅटफॉर्मवर उभे होते आणि मुलगा ट्रेनच्या दरवाज्याच उभा होता. थोड्या वेळात रेल्वे सुटते. त्यावेळी वडिलांना गहिवरून आलं. जशी ट्रेन सुटते तसं वडील रेल्वेसोबत चालताना दिसतात आणि हाताने इशारा करून काळजी करू नकोस, नीट जा, असं देखील डोळ्यांच्या शब्दात सांगताना दिसत आहे.

हेही वाचा :  FIFA World Cup : विजयाचा जल्लोष करताना दुर्घटनेचा हा थरार, Messi सह अर्जेंटिना टीमचा Video viral

पाहा Video –

दरम्यान, प्रत्येक मुलासाठी आपला बाप ग्रेट असतो. का कुणास ठाऊक? कोणतं प्रेम दोघांची गाठ सुटता सोडत नाही. आपल्या माणसांपासून लांब राहण्याचं दु:ख दोघांना सोडू देत नाही. पण काय करावं…जबाबदारीचं ओझं या नात्यात अधिक गोडवा घेऊन येतं. मुलाला वाईट वाटू नये म्हणून आपल्या भावना दाबून ठेवणाऱ्या प्रत्येक बापाला कडक सॅल्यूट! 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बापरे! हवेतल्या हवेत विमानाला गचके बसले आणि… हेवी टर्ब्युलन्समुळं प्रवाशांचा थरकाप; कोणी रडलं, कोणी किंचाळू लागलं

Indigo Flight Heavy Air Turbulence left passangers terrified : विमान प्रवासाला निघालं असताना या प्रवासाची …

Maharashtra Weather News : वीकेंडला मान्सूनचा मारा! विदर्भात ऑरेंज अलर्ट; कोकणातही मुसळधार, सर्रास आखा सहलींचे बेत

Maharashtra Weather News : राज्यापासून काहीसा दुरावलेला मान्सून आता परतला असून, या मान्सूननं आता राज्यासह …