प्रसिद्ध Youtuber कडून प्रियकराची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले अन् समुद्रात जाऊन…; थरकाप उडवणारी घटना

Crime News: आपल्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका युट्यूब सेलिब्रेटीला अटक केली आहे. आपल्या प्रियकराची हत्या केल्यानंतर, त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर ते एका सूटकेसमध्ये भरुन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. इतकंच नाही तर त्याने काही तुकडे समुद्रात फेकून दिले होते. थायलंडमध्ये ही घटना घडली असून, यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. 

प्राथमिक माहितीनुसार, डॅनियल सांचो ब्रोंचलोने (Daniel Sancho Bronzalo) आपला माजी प्रियकर एडविन एरिएटा आर्टेगाची (Edwin Arrieta Arteaga) हत्या केली. यानंतर त्याच्या शरिराचे तुकडे केले. यामधील काही तुकडे त्याने एका सुटकेसमध्ये लपवले. तसंच इतर तुकडे समुद्रात फेकून दिले. 

मिरर यूकेने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी डॅनियलवर गेल्या आठवड्यात थायलंडच्या कोह फांगनान बेटावर आपल्या साथीदाराची निर्घृपणे हत्या केल्याचा आरोप लावला आहे. अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, आर्टेगाच्या शरिराचे काही भाग 3 ऑगस्ट रोजी लोकांना कचऱ्यात सापडले होते. 

डेनिलयचे युट्यूबला हजारो फॉलोअर्स

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय डॅनियलचे सोशल मीडियावर 12 हजार 400 फॉलोअर्स आहेत. तो 31 जुलैपासून थाई रिसॉर्टमध्ये होता. पण त्याचं आपलं कोलंबियामधील प्रियकराशी भांडण झालं होतं. दोघे एक वर्षापासून अधिक काळ संबंधात होते. हे कपल फूल मून पार्टीत सहभागी होण्यासाठी बेटावर आलं होतं अशी माहिती आहे. डॅनियलने आपल्या मित्रांसह पार्टी करण्याआधी एडविनची निर्दयीपणे हत्या केली. यानंतर त्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. 

हेही वाचा :  Viral Video : ''असं प्रोपोज करशील तर कुणी कसं नाही बोलणार'', प्रेयसीसाठी त्यांची भन्नाट कल्पना

बँकॉक पोस्टच्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, डॅनियलने एडविनच्या शरीराचे काही तुकडे समुद्रात फेकून दिले होते. शोध घेतला असता मृतदेहाचा हात आणि डोकं सापडलं आहे. याआधी पोलीस समुद्राच्या त्या भागात पोहोचले होते, जिथे मृतदेह सापडला होता. 

मूळचा स्पेनचा असणाऱ्या डॅनियलला पोलिसांनी अटक केली असून, ताब्यात ठेवलं आहे. सध्या त्याला पोलिसांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आली आहे. सोमवारी त्याला थायलंडमधील कोर्टात हजर करण्यात आलं. त्याच्यावर पूर्वनियोजित हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा आरोप आहे. तसंच मृत्यूचं कारण लपवल्याचा आरोप आहे. पोलिसांना बेटावरील एका दुकानातून चाकू, प्लास्टिक बॅग सापडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डॅनियलचे वडील थायलंडसाठी रवाना झाले आहेत.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धक्कादायक! पुण्यात सापडले ‘झिका’चे 2 रुग्ण; 15 वर्षीय चिमुकलीचाही समावेश

Zika Virus Cases In Pune: पुण्यामधील एरंडवणामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली …

Maharashtra Weather News : बापरे! ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहणार; राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षी नैऋत्य मान्सून वारे वेळेआधीच देशात आणि राज्यात दाखल झाले. …