Pariksha Pe Charcha 2022: पंतप्रधानांकडून विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षेच्या टिप्स

Pariksha Pe Charcha 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोर्डाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी लोकप्रिय वार्षिक कार्यक्रम ‘परीक्षा पे चर्चा’ थोड्याच वेळात सुरु होणार आहे. करोना साथीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून याचे ऑनलाइन पद्धतीने आयोजित केले जात होते. यावेळेस परीक्षा पे चर्चा नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये ऑफलाइन पद्धतीने आयोजित केली जात आहे.

जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, परीक्षा पे चर्चा २०२२ सकाळी ११ वाजल्यापासून सुरु होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर पाहता येईल. याशिवाय परीक्षा पे चर्चा २०२२ हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीनेही पाहता येईल. विद्यार्थ्यांना MyGov India च्या युट्यूब चॅनेल, भारत सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम थेट पाहता येणार आहे.

पीएम मोदी देणार परीक्षेच्या टिप्स
२०१८ पासून दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात देशभरातील बोर्डाच्या परीक्षेला बसलेले शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पंतप्रधानांशी संवाद साधतात. कार्यक्रमादरम्यान, विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण कसा दूर करावा, परीक्षेदरम्यान चांगली कामगिरी कशी करावी आणि परीक्षेला ओझे म्हणून घेऊ नये यासारख्या मुद्द्यांवर पंतप्रधानांना प्रश्न विचारतात. दुसरीकडे, पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांना प्रेरणादायी उदाहरणांसह उत्तरे देतात. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी केवळ विद्यार्थीच नाही तर त्यांचे पालक आणि शिक्षकही पंतप्रधानांकडून टिप्स घेतात.

हेही वाचा :  Employment: गेल्या सात वर्षात रोजगार २२ टक्क्यांनी वाढला, 'या' क्षेत्रात वाढल्या संधी

Pariksha Pe Charcha: ‘परीक्षा पे चर्चा’साठी शाळांमध्ये व्यवस्था करा; शिक्षण विभागाच्या सूचना

‘परीक्षा पे चर्चा’ १ एप्रिल रोजी होणार, पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
१२ लाखांहून अधिक विद्यार्थी २.७ लाखांहून अधिक शिक्षक आणि ९० हजारांहून अधिक पालकांनी ‘परीक्षा पे चर्चा २०२२’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. ‘परीक्षा पे चर्चा २०२२’ साठी नोंदणी २८ डिसेंबर २०२१ पासून सुरू झाली. नोंदणीची २० जानेवारी २०२२ ही नोंदणीची अंतिम तारीख होती. जी वाढवून २७ जानेवारी आणि नंतर ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली.

NEET UG २०२२ च्या नोटिफिकेशनसंदर्भात महत्वाची अपडेटICAI CMA फाउंडेशन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
केंद्रीय विद्यालयात सुविधा
शहरातील केंद्रीय विद्यालयात ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम विद्यार्थ्यांना लाइव्ह पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य एकांत पटेल यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलतांना दिली. शाळेतील विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी प्रोजेक्टर, ऑनलाइन लिंक देऊनही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात जवळपास आठवी ते बारावीचे सहाशे विद्यार्थी ऐकण्यासाठी सहभागी होतील, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस उपप्राचार्च एच. आर. चौधरी, उपप्राचार्य ममता राणी, मुख्याध्यापक प्रकाश वाघमारे, अध्यापक संजय आधाने, हृषीकेश यदमाळ यांची उपस्थिती होती.

हेही वाचा :  Gender Equality: शाळेत सर आणि मॅडम म्हणण्याचे दिवस गेले, 'शिक्षकांना 'अशा' प्रकारे करा संबोधित'

परीक्षा पे चर्चा २०२२ कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MHT CET 2022: महाराष्ट्र सीईटी परीक्षेच्या नोंदणीची मुदत वाढविलीMPSC ग्रुप सी पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, ‘येथे’ करा डाऊनलोड

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …