Fact Check : युक्रेन बंदरावरील’रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याचा’ VIRAL VIDEO मागील सत्य समोर

Ukraine Drone Attack Video : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia-Ukraine War)सुरु असून युक्रेनच्या एका ड्रोनने रशियातील हल्ला केला. हा ड्रोन हा रशियाची राजधानी मॉक्सोमधील दोन इमारतींवर झाला. या घटनेनंतर या हल्लाचे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल व्हायला लागले. पण या व्हिडीओमागील सत्य समोर आले आहे. (fact check russian missile attack on ukraine viral video)

काय आहे ‘या’ व्हिडीओमागील सत्य?

30 सेकंदचा हा व्हिडीओ तीन क्लिपचा कोलाज असून या प्रचंड स्फोट दाखविण्यात आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ फेसबुकवर एका व्यक्तीने शेअर केला आहे. त्यावर त्याने लिहिलं आहे की, युक्रेनच्या ओडेसा बंदरावर चार रशियन क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला आहे. ज्यामध्ये युक्रेनियन सैन्याला शस्त्रे वितरीत करणाऱ्या दोन ब्रिटीश मालवाहू जहाजांना धडक दिली. त्यातून हा मोठा स्फोट झाला आहे. 

Fact Check !

या व्हिडीओमागील सत्य शोधताना असं दिसून आला की, ही क्लिप 2020 मध्ये बेरूतच्या बंदरातील (2020 beirut explosion) स्फोटा आहे असं समोर आला आहे. बेरूतच्या बंदरावर 9 ऑगस्ट 2020 मध्ये अरेबिया इंग्लिशने YouTube वर हा 37 सेकंदा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर त्याने लिहिलं होतं की, ”बेरूतचा स्फोट इमारतीच्या वरच्या बाजूला दिसून येतं आहे.”

हेही वाचा :  VIDEO: बॅडमिंटन खेळतानाच व्यापाऱ्याला आला हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात जाऊन झोपला अन्...

मिळालेल्या माहितीनुसार बेरुत लेबनॉनमध्ये एक मोठा स्फोट झाला होता. त्यात एका गोदामात अंदाजे 2,750 टन असुरक्षितपणे साठवलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला होता. या स्फोटात 218 लोकांचा दुदैवी मृत्यू झाला होता तर 7000 लोक जखमी झाले होते. 

दुसरी क्लिप 

दुसऱ्या क्लिपमध्ये असंच दिसतंय की, 2020 मध्ये बेरूत स्फोटानंतर तीन दिवसांनी ट्विट केलं गेलं. या ट्विटमध्ये डॉग पॅलेस लेबनॉन आणि मॅवेरिकच्या कॅफेमधून झालेल्या स्फोटाचे हे दृश्यं आहे. जॅक जी इसा या व्यक्तीने लिहिलं आहे की, ”आम्ही सर्व ठीक आहात आणि आमचा श्वानही ठीक आहे.” 

या शोधातून हे सिद्ध होतोय की सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ हा युक्रेन बंदरावरील’रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याचा’ नसून तो बेरूत स्फोटातील आहे. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …