दगडूशेठ हलवाई गणपतीला 50 लाख मोग-याचा पुष्पनैवेद्य; अनोखा मोगरा महोत्सव

Shrimant Dagdusheth Ganpati Mandir, Pune : सुवासिक फुलांनी सजलेले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या 50 लाख फुलांसह झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा सारख्या फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांचे शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले गणरायाचे रुप अधिकच मनोहारी दिसत होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी आदी उपस्थित होते.

दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी तब्बल 250 महिला व 100 पुरुष कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये 3500 किलो गुलछडी, 800 किलो झेंडू, 120 किलो कन्हेर फुले, 1 लाख गुलाब, 70 हजार चाफा, 100 कमळे, 1 लाख लिली, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. गणरायाच्या मूर्तीला केलेली रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला  उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.

हेही वाचा :  विद्येचं माहेरघर बनतंय ड्रग्स कॅपिटल, पुण्यात भर वस्तीत अंमलीपदार्थांचा कारखाना... असा झाला खुलासा

पुण्यातील दगडूशेठ मंदिराला होळीपौर्णिमेनिमित्त द्राक्षांची आरास करण्यात आलीये. यासाठी 2 हजार किलो द्राक्षांचा वापर करण्यात आलाय. ही द्राक्षं नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणारेत. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा चरणी 151 किलोचा मोदक अर्पण करण्यात आला. वडगाव मावळ येथील जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांनी हा 151  किलोचा मोदक बाप्पाच्या चरणी अर्पण केला. काका हलवाईचे महेंद्र गाडवे आणि युवराज गाडवे यांनी हा मोदक साकारला आहे. या मोदकाला काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे यांसह चांदीचे वर्क केलेले असून सलग 8 तासांच्या मेहनतीनंतर 15 कारागिरांच्या मदतीने हा मोदक करण्यात आला.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ दावा

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. उद्धव …

सात किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 पॉलिसी आणि… पाहा किती आहे कंगनाची संपत्ती?

Kangana Ranaut Net Worth: ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनू’ या सारख्या चित्रपटातून बॉलिवूडवर आपली वेगळी छाप …