ताज्या

विदा अभ्यासाचे महत्त्व करोना काळात अधोरेखित

देशाचे माजी मुख्य संख्याशास्त्रज्ञ डॉ. प्रवीण श्रीवास्तव यांचे मत पुणे : करोना काळात सर्वसामान्य नागरिकांना विदाचे (डेटा) महत्त्व कळले. रुग्णसंख्या, वाढणारी रुग्णसंख्या, लाटांचे अनुमान या विषयी नागरिकांमध्ये चर्चा होऊ लागली. विदा अभ्यासाचे महत्त्व करोना काळात अधोरेखित झाल्याचे मत, देशाचे माजी मुख्य संख्याशास्त्रज्ञ डॉ. प्रवीण श्रीवास्तव यांनी शुक्रवारी मांडले. गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्थेतील लोकसंख्या संशोधन केंद्र, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब …

Read More »

भारत-श्रीलंका कसोटी मालिका : पंतचा झटपट पंथ! ; भारताची ६ बाद ३५७ अशी शानदार मजल; विहारीचे अर्धशतक

मोहाली : विराट कोहलीच्या शतकी कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर ऋषभ पंतच्या फटकेबाजीने छाप पाडली. श्रीलंकेच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला करीत ऋषभने काढलेल्या ९६ धावांच्या बळावर भारताने पहिल्या कसोटी सामन्याच्या दिवशी ६ बाद ३५७ अशी शानदार मजल मारली. कोहलीचा १०० वा कसोटी सामना पाहण्यासाठी पाच हजार क्रिकेटरसिकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळाला होता. कोहलीने डावाला उत्तम सुरुवात केली. परंतु ४५ धावांवर तो बाद होताच …

Read More »

गव्हातील तेजी फायद्याची; पण खाद्यतेलात कोंडी ; रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम

दत्ता जाधव, लोकसत्ता पुणे : रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात गहू आणि मक्याचे दर तेजीत आहेत. त्याचा फायदा देशातील शेतकरी आणि प्रामुख्याने व्यापाऱ्यांना होणार आहे. मात्र, भारतात युक्रेन आणि रशियातून मोठय़ा प्रमाणावर सूर्यफूल तेल आयात होत असल्यामुळे खाद्यतेलाच्या बाबत कोंडी होणार आहे. आयात घटून सूर्यफूल तेलाच्या दरात वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गव्हाच्या उत्पादनात युक्रेन आणि रशिया हे …

Read More »

अनधिकृत कारखान्यांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गाला आगीचा धोका

विनापरवाना दुकानांत अग्नीसुरक्षेचे नियमही धाब्यावर, पालिकेकडून कारवाई नाहीच विरार : वसई विरारजवळील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठय़ा प्रमाणात भंगारची दुकाने, फ्रिज, एसी तयार करणारे कारखाने आहेत. अग्नीसुरक्षेचे कोणतेही नियम येथे पाळले जात नाहीत. त्यामुळे महामार्गाला आगीचा धोका निर्माण झाला आहे. वसई विरार महापालिका क्षेत्रातील वसई पूर्वेला महामागार्वर अतिक्रमण झाले आहे. त्यात प्रामुख्याने भंगारचे कारखाने आहेत. मागील वर्षभरापासून या परिसरात १०० हून अधिक …

Read More »

‘सेन्सेक्स’मध्ये ७६९ अंश घसरण

मुंबई : जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेत आणि रशिया-युक्रेनमधील तणावात दिवसेंदिवस अधिकच भर पडत असल्याने जगभरातील भांडवली बाजारांनी धसका घेतला आहे. परिणामी शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण कायम राहिली. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने १,२१४.९६ अंशांच्या घसरणीसह ५३,८८७.७२ अंशांचा तळ गाठला होता. मात्र उत्तरार्धात तो सावरत, दिवसअखेर ७६८.८७ अंशांच्या घसरणीसह ५४,३३३.८१ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर …

Read More »

मध्य रेल्वेवर रविवारी आठ तासांचा मेगाब्लॉक

मुंबई : विविध तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या दिवा ते कल्याण दरम्यानच्या दोन्ही धीम्या मार्गावर येत्या रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आठ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावरही काहीसा परिणाम होईल. ठाणे येथून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या आणि अर्ध जलद लोकल ब्लॉकच्या वेळी दिवा ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. तर कल्याणहून ठाण्याच्या …

Read More »

“आठवणींसाठी धन्यवाद”; रणवीर सिंगपासून शिल्पा शेट्टीपर्यंत शेन वॉर्नच्या निधनानंतर बॉलीवूडने व्यक्त केला शोक

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. शेनच्या व्यवस्थापन संघाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत तो कोह सामुई, थायलंड येथील त्याच्या व्हिलामध्ये बेशुद्ध पडला असल्याचे सांगितले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याला वाचवता आले नाही. शेनच्या मृत्यूच्या वृत्ताने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांना विश्वास …

Read More »

Russias attack on Ukraine : “बॉम्ब हल्ले होत असताना जिवंत परतण्याची शाश्वती नव्हती” ; वसईच्या ऐश्वर्याचा थरारक अनुभव

आम्ही बंकर मध्ये लपायचो. कधी काय होईल सांगता येत नव्हतं, असंही सांगितलं आहे. “शहरात बॉम्ब हल्ले होत असताना आम्ही बंकर मध्ये लपायचो. कधी काय होईल सांगता येत नव्हतं. सुखरूप परतायची आशा नव्हती, पण सुदैवाने मी माझ्या घरी पोहोचली. अशा शब्दात युक्रेन मधून सुखरूप परतलेल्या वसईच्या ऐश्वर्या राठोड या तरुणीने युक्रेनमधील थरारक अनुभव सांगितले. वसईच्या वसंत नगरी येथे राहणारी ऐश्वर्या राठोड …

Read More »

शेन वॉर्नसाठी भारत राहिला कायमच खास; पदार्पणापासून ते आयपीएलच्या पहिल्या जेतेपदापर्यंत

क्रिकेट चाहत्यांसाठी एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न आता या जगात नाही. ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ५२ वर्षीय वॉर्नचा थायलंडमधील कोह सामुई येथे मृत्यू झाला. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. १४५ कसोटी सामन्यात …

Read More »

‘झुंड’ निमित्त चित्रपटगृहाबाहेर लागले अमिताभ बच्चन सोबत नागराज मंजुळेचे भव्य कटआउट

हाताने रेखाटलेले हे भले मोठे कटआउट चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका असलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘ झुंड ‘ चित्रपट सोलापुरात चित्रपटगृहात धुमधडाक्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे सार्वत्रिक कौतुक होत असताना सोलापुरात ज्या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्या चित्रपटगृहाबाहेर अमिताभ बच्चन यांच्यासह नागराज मंजुळे यांचे हाताने रेखाटलेले भले मोठे पोस्टर उभारण्यात आले आहे. …

Read More »

Blog : 90’s Kids… क्रिकेट… अन् शेन वॉर्न…

स्वप्निल घंगाळे शेन वॉर्नचं निधन झाल्याचं कळतंय… असा मेसेज ऑफिसच्या ग्रुपवर पाहिला आणि मोर्चा लगेच ट्विटरकडे वळवला तर बातमी खरी निघाली… खरं तर त्याला ना कधी भेटलो, ना त्याचे रेकॉर्ड तोंडपाठ आहेत ना मी ऑस्ट्रेलियन टीमचा चाहता आहे. पण त्याच्या निधनाच्या बातमीने इतर सेलिब्रिटी डेथच्या बातम्यांप्रमाणे पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित झाली की आयुष्य फारच अनसर्टन आहे…. दुसरा त्याहून महत्वाची …

Read More »

Shane Warne Died : युक्रेनवर होणाऱ्या हल्ल्यांवर शेन वॉर्नने दिली होती प्रतिक्रिया, म्हटले होते की…

जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटूंसह अनेकांनी शेन वॉर्नच्या निधानवर शोक व्यक्त केला आहे. जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे आज वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटूंसह क्रिकेट जगातीशी निगडीत असलेल्या तसेच अन्य क्षेत्रांमधील व्यक्तींनी देखील शेन वॉर्नच्या निधानाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शेन वॉर्नने आठवडाभरापेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया- …

Read More »

“कोहलीमुळे कसोटी क्रिकेट सुरक्षित”; जेव्हा शेन वॉर्नने केले होते विराटचे कौतुक

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू आणि महान लेगस्पिनर शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने एक संक्षिप्त निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये त्यांचा थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. वॉर्नच्या निधनानंतर क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. …

Read More »

“तुझ्या मनात भारतासाठी…”; शेन वॉर्नच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरचे भावनिक ट्विट

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरही वॉर्नच्या निधनाने दुखावला आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून १४५ कसोटी सामन्यांमध्ये ७०८ विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वॉर्नने १९४ सामन्यांत २९३ बळी घेतले आहेत. त्याने प्रथम श्रेणीत १३१९ विकेट घेतल्या. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी …

Read More »

Shane Warne Died : शेन वॉर्नच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा ; सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, सेहवागसह अनेकांकडून शोक व्यक

शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची …

Read More »

जेव्हा शेन वॉर्नने आपल्या एका चेंडूने जगाला केले होते थक्क; जाणून घ्या ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ बद्दल

मी असा चेंडू टाकू शकतो असे मला कधीच वाटले नव्हते, असे वॉर्नने म्हटले होते ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे शुक्रवारी  निधन झाले आहे. शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे त्याच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. …

Read More »

‘या’ पासवर्डमुळे तुमचे खाते होऊ शकते हॅक, महत्त्वाच्या ट्रिक्स करा फॉलो

इंटरनेटच्या या जगात जिथे आपण जवळपास सर्व काही ऑनलाइन करत असतो. त्यात आता हॅकिंग ही एक सामान्य परंतु गंभीर समस्या आहे. आपल्या जवळपास सर्वांचे ईमेल खाते असेल, जे सहसा पासवर्ड-संरक्षित असते. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खाती असो किंवा इतर अॅप्स, सर्वत्र पासवर्ड वापरले जातात. तुम्हाला अशाच काही पासवर्डबद्दल सांगणार आहोत, जे सहजपणे हॅकिंगचे शिकार होऊ शकतात. याव्यतिरिक्त, तुम्हाला हे देखील …

Read More »

दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. कोह सामुई, थायलंड येथे हृदयविकाराच्या झटक्याने वॉर्नचा मृत्यू झाला. वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही शेन वॉर्नला वाचवण्यात अपयश आले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा दुसरा धक्का आहे. रॉड मार्शच यांचेही गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी निधन झाले होते. शेन वॉर्नने …

Read More »

पेट्रोल आणि डिझेल १२ रुपयांनी महागणार!; पुढील ११ दिवस कठीण

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असून गेल्या चार महिन्यांपासून इंधनाचे दर वाढलेले नाहीत. मात्र, आता पुढील ११ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १२ रुपयांनी वाढ होऊ शकते. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने एका अहवालात ही माहिती दिली आहे. तर कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल ११५ डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या ताज्या अहवालानुसार, विक्रेत्यांना आंतरराष्ट्रीय बाजारातून चढ्या भावाने कच्चे तेल आयात …

Read More »

मोठी बातमी । आमदार, खासदारांचे प्रलंबित फौजदारी खटले; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला हे निर्देश

मेघा कुचिक / मुंबई : Maharashtra and Goa Political leaders : महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील आजी आणि माजी खासदार, आमदारांविरुद्ध प्रलंबित खटल्यांशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने स्वतःहून दखल घेत दाखल केलेल्या सू मोटो याचिकेवर आज सुनावणी झाली. (Political Leader criminal cases) मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सोमवारी 7 मार्चला पुन्हा सुनावणी होणार आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे …

Read More »