दोन शत्रू ग्रहांच्या युतीमुळे युद्धस्थिती! काय सांगते ज्योतिषशास्त्र आणि कोणत्या राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या


वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदल करतो किंवा दुसऱ्या ग्रहासोबत युती होते, तेव्हा त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो. मंगळ ग्रहाने २६ फेब्रुवारी रोजी मकर राशीत प्रवेश केला आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदल करतो किंवा दुसऱ्या ग्रहासोबत युती होते, तेव्हा त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो. मंगळ ग्रहाने २६ फेब्रुवारी रोजी मकर राशीत प्रवेश केला आहे. या राशीत शनी ग्रह आधीच विराजमान आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शनि आणि मंगळाची युती होणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा जेव्हा शनि आणि मंगळ युती होते, तेव्हा जाळपोळ, अपघात, युद्ध असे प्रकार घडतात, असं ज्योतिषांचं म्हणणं आहे. त्यामुळे या युतीचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असला तरी तीन राशींना काळजी घेणे आवश्यक आहे.

कर्क: मंगळ आणि शनी युती तुमच्या गोचर कुंडलीत सप्तम भावात आहे. या स्थानाला वैवाहिक जीवन आणि जोडीदारीचे स्थान म्हणतात. यावेळी तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. तसेच या काळात भागीदारीच्या कामात नुकसान होऊ शकते. भागीदारीचे नवीन काम सुरू न केल्यास चांगले होईल. त्याचबरोबर वाहन जपून चालवा कारण अपघात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  West Bengal Violence:: अमित शाह Action Mode वर! रामनवमी हिंसाचार प्रकरणात ममता बॅनर्जी सरकारच्या अडचणी वाढणार?

धनु: मंगळ आणि शनी युती तुमच्या राशीतील दुसऱ्या स्थानात तयार होत आहे. या स्थानाला धन आणि वाणीचे घर स्थान म्हणतात. यामुळे तुम्हाला व्यवसायात नफा कमी होऊ शकतो. व्यवसायातील कोणताही करार कायमस्वरूपी राहू शकत नाही. या काळात आपल्या बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाबद्दलही वाईट बोलू नका आणि सर्वांशी चांगले वागा. अन्यथा तुमचे संबंध बिघडू शकतात.

Guru Uday 2022: अस्ताला गेलेल्या गुरु ग्रहाचा ‘या’ दिवशी होणार उदय, तीन राशींवर पडेल सकारात्मक प्रभाव

कन्या: तुमच्या राशीतून पाचव्या भावात शनी आणि मंगळाचा संयोग होत आहे. ज्याला लव्ह लाईफ आणि मुलांचा, उच्च शिक्षणाचा आत्मा म्हटले जाते. त्यामुळे या काळात तुमचे प्रेमसंबंध बिघडू शकतात. यावेळी तुम्हाला मुलांशी संबंधित काही समस्या बघायला मिळू शकतात. तुमच्या पदोन्नती आणि वेतनवाढीला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना यावेळी अभ्यासात कमी जाणवेल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Tinder गर्ल गोडीगुलाबीने कॅफेत बोलावायची, नंतर यायचा मॅनेजर; डेटींग अ‍ॅपवरुन ‘अशी’ चालायची फसवणूक

Delhi Tinder Date Fraud: सध्याच्या जगात तरुण-तरुणी एकमेकांना भेटण्यासाठी ऑनलाइन डेटिंग अॅपचा वापर करतात. पण …

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? हा वाद वर्षानुवर्ष सुरु आहे. आता सरकारने …