सुनेत्रा पवारांना उमेदवारीसाठी भाजपचा आग्रह? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

Ajit Pawar on sunetra Pawar: राज्याच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघाची चर्चा जोरात आहे. येथे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होत आहे. भाजपच्या दबावामुळे सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली, अशी टिका अजित पवारांवर केली जाते. घरातील उमेदवाराच्या विरोधात घरातील उमेदवार देऊन भावनिक राजकारण केले गेल्याची टीकाही केली जाते. या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलंय. झी 24 तासच्या ‘टू द पॉईंट’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांच्या प्रश्नांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तरे दिली.

ही निवडणूक राष्ट्रीय पातळीवरची आहे. ही भावकी-गावकीची निवडणूक नाही. देशाची सुत्र पुढच्या 5 वर्षासाठी कोणाकडे द्यायची? यासाठी ही निवडणूक आहे. देशाचे पंतप्रधान यांना पुन्हा निवडणून आम्ही देणार आहोत. मोदी विरुद्ध राहूल गांधी अशी ही निवडणूक असल्याचे ते म्हणाले. 

निवडणुकीत आपल्या विरोधात घरातलेच आहेत, हे सांगताना अडचण येते का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, मी या निवडणुकीत विकासावर मत मागतोय. गेल्या 34 वर्षात मी काय काम केलंय, हे मतदारांना चांगलं माहिती असल्याचे ते म्हणाले. सेंट्रलचा निधी आणून आपल्याला विकास करायचा आहे. मला कामाची आवड आहे. मी स्वत:ला झोकून देतो. 

हेही वाचा :  पोट सतत फुगतं, साफ होत नाही, भूक लागत नाही, मग खा Gas-Acidity झटक्यात मुळापासून उपटणारे हे 8 पदार्थ

केंद्रीय मंत्री पद बारामतीकडे होते तरी बारामतीच्या विकासाबद्दल का बोलले जाते? यावर बोलताना, आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे ते म्हणाले. आधी रस्ते, वीज, पाणी याच लोकांच्या मागण्या होत्या. त्यांना चांगल शिक्षण हवंय. त्यांना मैदान हवंय. वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळ्या सुविधा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. 

वेगळा पक्ष काढायला हवा?

आम्ही 10 जून 1999 ला सभा झाली तेव्हापासून राष्ट्रवादी पार्टीशी निगडीत आहोत. त्यामुळे वेगळा पक्ष काढण्याचा विषय नाही. 
आम्ही ज्यांना दैवत मानलं होतं. ते म्हणतील ती पूर्व दिशा आम्ही मानलं. पण काहीतरी ठोस भूमिका पाहिजे. ज्यांना दैवत मानलं त्यांच्याबद्दल पाठीमागच्या गोष्टी आता काढायच्या नाहीत, असे त्यांनी सांगितले. 

सुनेत्रा पवारांना उमेदवारीसाठी भाजपचा आग्रह?

आम्ही प्रमुख नेत्यांनी चर्चा करुन उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. यात भाजपचा हात नव्हता. आम्हाला बदनाम करण्यासाठी चर्चा सुरु असतात. सुनेत्रा पवार अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतात. पर्यावरण क्षेत्रात त्यांचे चांगले काम आहे. टेक्सटाईल पार्कमध्ये 5-6 हजार महिलांना त्यांनी रोजगार दिलाय. आम्ही राजकरण करत असताना बारामतीचा प्रचार त्या संभाळायच्या. 

हेही वाचा :  Weather Update : वातावरणाच्या बदलामुळे अलर्ट जाहीर,पावसाचं पुनरागमन तर काही ठिकाणे उन्हाचे चटके

अजित पवार कुटुंबात एकटे पडले?

1962 ला वसंसतदादा पवार यांना तिकीट मिळाले. त्यावेळीदेखील विरोध झाला. पवार कुटुंबासाठी हे काही नवीन नाही. 1978 लादेखील असा प्रकार झाला. यावर एक पुस्तक लिहिता येईल. नव्या पिढीला या गोष्टी माहिती नाहीत. मी एकटा पडलो नाही. बारामती माझं कुटुंब आहे. त्या पद्धतीने मी पुढे चाललोय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: ‘I, Nilesh Dnyandev Lanke..’, लंकेंची थेट इंग्रजीत शपथ; हात जोडत ‘रामकृष्ण हरी’ने शेवट

Nilesh Lanke Took Oath In English: ‘I, Nilesh Dnyandev Lanke Having Being Elected A Member …

27 दिवसांचाच इंधनसाठा शिल्लक; सुनीता विल्यम्स यांच्यापुढं अंतराळात नवं आव्हान; NASA कडून व्हिडीओ शेअर

NASA Shares a video : अंतराळ क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि महत्त्वाची संशोधनं करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या …