Assembly Election 2023 Result : ईशान्यकडील राज्यात काँग्रेसला मोठा धक्का; तर या दोन ठिकाणी भाजप आघाडीवर

Assembly Election 2023 Result – Meghalaya, Tripura, Nagaland  : देशात तीन राज्यांतील निवडणुकीचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. (Assembly Election 2023 Result) ईशान्यकडील त्रिपुरा आणि नागालॅंडमध्ये भाजपने सुरुवातीला आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी भाजप सत्तेच्या दिशेने जाताना दिसत आहेत.  तर मेघालयात भाजप पिछाडीवर दिसून येत आहे. येथे एनपीपीने 25 जागांवर तर टीएमसी 9 जागांवर आघाडीवर आहे.

त्रिपुरात भाजपने मोठी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. भाजपने त्रिपुरात 39 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी ) 15, टीएमपी 6 जागांवर आघाडीवर आहे. तर नागालँडमध्ये एनडीचा घटकपक्ष असलेला एनडीपीपी 50, एनपीएफ 6, तर काँग्रेस एक जागेवर आघाडीवर आहे. मेघालयात एनपीपी 22, भाजप 10, टीएमसी 10, यूडीपी 8 आणि काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

2 राज्यांमध्ये भाजपची विजयाकडे वाटचाल

ईशान्येतील 3 पैकी 2 राज्यांमध्ये भाजप विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. नागालँडमध्ये भाजप 54 जागांवर आघाडीवर आहे. एनपीएफ आणि राष्ट्रवादीला केवळ 2-2 जागांवर आघाडी मिळाली. त्याचवेळी त्रिपुरामध्ये भाजप बहुमताच्या जवळ पोहोचला आहे. भाजप 30 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय मेघालयात कोणालाही बहुमत मिळताना दिसत नाही. येथे NPP 25 जागांवर पुढे आहे. TMC 11 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे मेघालय आणि नागालँमध्ये काँग्रेसची मोठी पिछेहाट झाल्याची दिसून येत आहे. मेघालयात एनपीपी बाजी मारताना दिसून येत आहे. नागालॅंडमध्ये भाजपने आघाडी घेतली असून काँग्रेस पिछाडीवर आहे. येथे भाजप सत्ता स्थापन करु शकते अशी परिस्थिती आहे.

हेही वाचा :  भारत-श्रीलंका कसोटी मालिका : कसोटीवर पकड मजबूत

सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने

ईशान्येकडील नागालँड, मेघालय आणि त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने दिसत आहेत. मेघालयातील 13 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीसाठी 27 निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी, नागालँडमध्ये 16 केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. सुरक्षेसाठी येथे 15 हजारांहून अधिक सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. 

नागालँडमध्येही मतमोजणीची विशेष तयारी सुरू आहे. मतमोजणी केंद्राबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राजधानी आगरतळामध्ये कलम 144 लागू आहे. त्रिपुराच्या बोर्डोवली सीटवर लोकांची विशेष नजर आहे. येथे सीएम माणिक साहा आणि काँग्रेसचे आशिष कुमार साहा यांच्यात लढत आहे. मेघालयमध्ये भाजप पहिल्यांदाच 60 जागांवर निवडणूक लढवत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला होता. त्रिपुरातील 259 उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. मतमोजणीसाठी 21 केंद्रे तयार करण्यात आली आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …