आयफोन चार्ज करताना तुम्हीपण या चुका करता का? अ‍ॅपल कंपनीने केले सावध

iPhone Charging Mistakes: तुम्हालाही रात्रभर फोन चार्ज करुन ठेवण्याची सवय आहे का. जर तुम्हीदेखील ही चुक करत असाल तर आत्ताच सावध व्हा. अॅपल (Apple) कंपनीने आयफोन युजर्ससाठी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. रात्रभर फोन चार्जिंगला लावण्याची सवय जीवघेणी ठरु शकते, असा इशारा कंपनीने दिला आहे. कसं ते जाणून घ्या. (Avoiding iPhone Charging Problems)

अनेकांना फोन चार्जिंगला लावण्याची योग्य वेळ ही रात्रीची वाटते. कारण आपण रात्री फारकाळ फोन वापरत नाही. तसंच, सकाळी उठल्याबरोबर फोन पूर्ण चार्ज असतो. त्यामुळं सकाळच्या कामाच्या गडबडीत त्याचा उपयोग होऊ शकतो. मात्र, रात्रभर फोन चार्गिंगला ठेवून झोपून गेल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. अॅपल कंपनीने एक इशारा दिला आहे. त्यानुसार, आयफोनला चार्जला लावून कधीच झोपू नये. कारण अशा स्थितीत फोनला आग लागू शकते, किंवा शॉक लागू शकते किंवा गंभीर इजा पोहोचू शकते किंवा आयफोन किंवा अन्य संपत्तीला नुकसान पोहोचू शकते. 

ओव्हरहिट होऊ देऊ नका

तसंच, फोन चार्ज करत असताना त्याला योग्यरित्या हवा मिळाली नाही तर धोका निर्माण होऊ शकतो. साधारणता लोक चार्जिंगला लावल्यानंतर फोन उशीखाली ठेवून देतात. त्यामुळं फोन ओव्हरहिट होऊ शकतो. त्यामुळं फोन खराब होण्याचीदेखील शक्यता असते. तसंच ओव्हरहिट होऊन फोनला आग लागण्याची शक्यता असते.

हेही वाचा :  Human evolution: चोचीसारखे दात अन् सरड्यासारखा बदलणार रंग, भविष्यातला माणूस कसा दिसेल?

उशीखाली फोन चार्जिंगला लावू नका

अॅपल कंपनीने म्हटलं आहे की, कोणतेही डिव्हाइस पॉवर अॅडॉप्टर किंवा वायरलेस चार्जरवर झोपू नका. तसंच, त्याच्यावर चादर, उशी सारख्या वस्तू ठेवून झोपू नका. तुम्ही तुमचा आयफोन वापरत असताना किंवा चार्ज करत असताना, पॉवर अॅडॉप्टर आणि कोणतेही वायरलेस चार्जरला .योग्य प्रमाणात हवा लागेल याची खात्री करुन घ्या.’

अॅपल कंपनीने दिला इशारा

दरम्यान, Apple कंपनीने इशारा देत म्हटलं आहे की तुम्ही तुमचे डिव्हाइस चार्ज करण्यासाठी थर्ड-पार्टी चार्जरचा वापर करता तेव्हा आग लागण्याचा धोका वाढू शकतो. कारण काही कमी किंमतीचे चार्जर अधिकृत अॅपल उत्पादनांसारखे सुरक्षित असू शकत नाहीत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ब्लॅक डॉटचं रहस्य काय? समजल्यावर आयफोन युजर्सदेखील होतील हैराण

iPhone Black Dark: आयफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. काहीजण टिकाऊ म्हणून आयफोन वापरतात तर …

विमानात असते ‘ही’ सिक्रेट रुम; शोधूनही सापडणार नाही अशा ठिकाणी असते ही खोली

Aeroplane secret room : विमानानं प्रवास करत असताना तिकीट काढण्यापासून संपूर्ण प्रवास आणि त्यानंतर अगदी …