अजितदादा म्हणतात ‘आमचा कार्यकर्ता नव्हता’, प्रशांत जगतापांनी केली पोलखोल, थेट ‘तो’ Video दाखवला

Prashant Jagtap On Ajit Pawar : पुण्यात आयोजित केलेल्या निर्भय बनो कार्यक्रमासाठी (Pune News) पोहोचलेल्या पत्रकार निखिल वागळे (Attack On Nikhil Wagle Car) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल घडली. विशेष म्हणजे पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना देखील वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने संताप व्यक्त केला जातोय. भाजपने हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिल्याने पुण्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. अशातच आता पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेत. तसेच आपला कोणताही कार्यकर्ता आपल्या नसल्याचं स्पष्टीकरण देखील दिलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी व्हिडीओ शेअर करत अजित पवारांची पोलखोल केलीये.

काय म्हणाले प्रशांत जगताप?

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे, विश्वंभरजी चौधरी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात अजितदादा पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी सामील होते याचा हा पुरावा, असं म्हणत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय.

पाहा Video

भाजपसह महायुतीमधील तिन्ही पक्षांनी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला चालू केला, त्यावेळी साक्षीदार म्हणून मी तिथे उपस्थित होतो. आम्हालाही मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. मी 27 वर्षांपासून पुण्यात राजकीय कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहे. मी जबाबदारीने सांगू इच्छितो की, काल निखिल वागळे सरांचा मर्डरच करण्याचा या सर्व लोकांचा प्रयत्न होता, असा घणाघाती आरोप यांनी प्रशांत जगताप केला आहे.

हेही वाचा :  Crime News: दिल्लीतील दरोड्याचा अखेर छडा लागला; पण आरोपींना पाहून पोलीसही चक्रावले, भाजी विकणारा..

जवळपास 100 एक विटा त्या लोकांकडे होत्या, सातत्याने गाडीत विटा मारल्या जात होत्या. पोलिसांनी तत्परता दाखवली असती, तर कालचा हा भयानक प्रकार घडला नसता. मला पोलिसांना दोष द्यायचा नाही ,परंतु या महायुती सरकारचे किती ऐकले पाहिजे हे पोलिसांनी ठरवावे. अजित दादांना गुंडगिरी पसंत नव्हती, पण कालचा हल्ला दादांच्या पक्षातील वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता सागरे यांनीच केला याबाबत मी कोर्टात साक्षी द्यायला देखील तयार आहे, असंही प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी या प्रकरणात 10 आरोपींना अटक केली आहे. पर्वती पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेले कार्यकर्ते हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असल्याची माहिती समोर आली आहे. 

वागळे हल्ल्यातील 10 आरोपींची नावे 

दीपक पोटे, गणेश घोष, गणेश शेरला, राघवेंद्र मानकर, स्वप्नील नाईक, प्रतिक देसरडा, दुष्यंत मोहोळ, दत्ता सागरे, गिरीश मानकर, राहुल पायगुडे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …