द्विशतकानंतर संघाबाहेर का होता? रोहितच्या प्रश्नावर इशानचं जबराट उत्तर, पाहा व्हिडीओ

IND vs NZ Rohit Sharma Shubman Gill Ishan Kishan: हैदराबाद येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला. शुभमन गिलच्या (Shubman Gill) द्विशतकी खेळीच्या बळावर भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात शुभमनने अनेक विक्रम मोडले. हैदराबाद येथील या सामन्यानंतर रोहित शर्मा, इशान किशन आणि शुभमन गिल या द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूंचा एक व्हिडीओ बीसीसीआयनं शेअर केला आहे. शुभमन गिल आणि इशान किशन या दोघांची मुलाखत रोहित शर्मा घेत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या मुलाखतीत खेळाडूंनी एकमेकांची अनेक गुपितं उलघडली आहेत.  

द्विशतकानंतर तू तीन सामन्यात संघाबाहेर का होता? असा प्रश्न रोहित शर्मानं इशान किशनला विचारला होता. रोहित शर्माच्या या प्रश्नाला इशान किशन यानं जबरदस्त उत्तर दिलं. रोहित भाई आपही कर्णधार थे! असं जबरदस्त उत्तर इशान किशन यानं दिल्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना हसू आवरलं नाही. 

पाहा व्हिडीओ – 

आपल्या द्विशतकाबद्दल बोलताना शुभमन गिल म्हणाला, ”मी खूप खूश आहे. श्रीलंकेविरोधातील पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात कसा आऊट झालो? याबाबत मी वारंवार विचर करत होतो. त्याप्रमाणे झालं नाही, अन् चांगलं झालं. या सामन्यात माझ्याकडे मोठी इनिंग खेळण्याची संधी होती.. त्याप्रमाणे मी खेळलो…” 

हेही वाचा :  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझमवरील आरोप फेटाळत दिलं सडेतोड उत्तर, पाहा ट्वीट

सामन्याआधी तुझं रुटीन काय असतं? असा प्रश्न शुभमन गिल याला विचारला, त्यावर तो म्हणाला की,  ” माझा प्री मॅच रूटीन हा (इशान किशन) खराब करतो. मला झोपू देत नाही. आयपॅडवर मोठ्या आवाजात चित्रपट पाहत असतो. याला कितीवेळा आवाज कमी कर म्हणून सांगत असतो.. पण हा चित्रपट पाहण्यात मग्न असतो… तू माझ्या रुममध्ये असतो…. त्यामुळे तुला माझ्या मर्जीनं राहावं लागेल, असं म्हणत असतो.”  

आणखी वाचा:
IND vs NZ : न्यूझीलंडनं सामना गमावला पण ब्रेसवेलनं मनं जिंकली, चाहत्यांनी ठोकला कडक सॅल्यूट

शुभमनचं वादळी द्विशतक अन् नेटकऱ्यांकडून सारा तेंडुलकर ट्रोल, काहींनी तर एंगेजमेंटची घोषणाच केली!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …