आता ब्यूटी पार्लरचे हजारो रुपये वाचणार!, घरच्या घरी अशा पद्धतीने करा ‘सॉफ्ट हेयर वॅक्स’

शरीरातील नको असलेले केस काढण्यासाठी महिला वॅक्सिंग करतात, त्यासाठी हजारो रुपये खर्च करतात. पण जर तुम्हाला हे पैसे वाचवयचे असतील तर तुम्ही घरच्या घरी काही उपाय करुन हे केस काढू शकता. त्यामध्ये ‘सॉफ्ट हेयर वॅक्स’ हा प्रकार वापरुन तुम्ही पैसे वाचवू शकतो. घरच्या घरी सॉफ्ट वॅक्स सहज बनवू शकता आणि याद्वारे केस सहज काढू शकता. सॉफ्ट हेयर वॅक्समुळे त्वचेमध्ये मुलायम आणि आर्द्रतायुक्त राहते. या पद्धतीमध्ये शरीरावरील केस सहजपणे निघतात आणि चिकटपणामुळे केस निघताना वेदनासुद्धा होत नाहीत. वॅक्सिंगची क्रिम शरीराला लावल्यानंतर त्यावर स्ट्रिप ठेवल्यास अनेकदा स्ट्रिपसोबत त्यासोबत केस निघत नाहीत. यामुळे आपल्याला त्रास तर सहन करावा लागतोच, शिवाय वेळही अधिक लागतो. अशा स्थितीत ‘सॉफ्ट हेयर वॅक्स’ हा उत्तम पर्याय असू शकतो. (फोटो सौजन्य :- istock)

सॉफ्ट वॅक्सिंगचे आश्चर्यकारक फायदे

सॉफ्ट वॅक्सिंगचे आश्चर्यकारक फायदे

सॉफ्ट वॅक्सचा प्रभाव केसांसोबत त्वचेवरही पडतो. म्हणून, हात, पाय यांसारख्या मोठ्या भागांवरील केस काढण्यासाठी ‘सॉफ्ट हेयर वॅक्स’चा वापर केला जातो. या वॅक्सिंगचा त्वचेला खूप फायदा होतो.

हेही वाचा :  उरले फक्त दोन दिवस! मतमोजणीच्या दिवशी वरुणराजा पुण्यात बरसणार

(वाचा :- क्रांती रेडकरने शेअर केला Hydra Facial चा व्हिडीओ, जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार) ​

सॉफ्ट वॅक्सिंग का करावे

सॉफ्ट वॅक्सिंग का करावे
  • हात, पाय, कंबर यासारख्या मोठ्या भागावरील नको
  • असलेले केस काढणे खूपच सोपे आहे.
  • सॉफ्ट वॅक्सिंग खूप स्वस्तात मिळते.
  • तुम्ही कोमट सॉफ्ट वॅक्सिंग देखील वापरू शकता.
  • सॉफ्ट वॅक्सिंगमुळे ग्लोइंग स्किनही यासोबत मिळते.
  • सॉफ्ट वॅक्सिंगमुळे त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासही मदत होते.
  • शेव्हिंगच्या तुलनेत वॅक्सिंगमुळे केसांची वाढ कमी होते.

घरी सॉफ्ट वॅक्सिंग कसे बनवायचे?

घरी सॉफ्ट वॅक्सिंग कसे बनवायचे?

घरी घरी सॉफ्ट वॅक्सिंग बनवण्यासाठी पुढील साहित्य वापरा.
– पांढरी दाणेदार साखर – 1 कप –
लिंबाचा रस – 1 टीस्पून
– मध – 1/4 कप
– पाणी – 1 टीस्पून
घरी वॅक्सिंग बनवण्याची कृती
सर्व प्रथम एका भांड्यात साखर आणि पाणी घालून मंद आचेवर ठेवा. साखर वितळल्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि मधही टाका.
मधेच मिश्रण ढवळत राहा म्हणजे ते जळणार नाही. मिश्रण थोडे घट्ट होऊ लागले की गॅस बंद करा. आता तुमचे सॉफ्ट वॅक्स हेअर रिमूव्हल वॅक्सिंगसाठी तयार आहे. हलक्या हाताने हे मिश्रण तुम्ही त्वचेवर टाकून हातावरील केस काढू शकता. फक्त स्ट्रिप त्वचेला एका बाजूने धरून सांच्या विरुद्ध दिशेने ओढा.

हेही वाचा :  बिकिनी वॅक्समुळे खरंच योनीमार्गाची स्वच्छता होते का? डॉक्टरांनी सांगितले सत्य

(वाचा :- Beauty tips : हट्टी Blackhead ला ‘या’ उपायांनी मुळासकट काढून टाका, चमकदार त्वचेसाठी एकदा नक्की वापरा) ​

सॉफ्ट वॅक्सिंग करताना ही खबरदारी लक्षात ठेवा

सॉफ्ट वॅक्सिंग करताना ही खबरदारी लक्षात ठेवा
  • हार्ड वॅक्सिंगपेक्षा सॉफ्ट वॅक्सिंग जरा जास्त वेदनादायक असू शकते.
  • तुमचे केस सोडले असले तरी, त्याच ठिकाणी पुन्हा सॉफ्ट वॅक्सिंग लावू नका.
  • सॉफ्ट वॅक्सचा जास्त वापर केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धक्कादायक! पुण्यात सापडले ‘झिका’चे 2 रुग्ण; 15 वर्षीय चिमुकलीचाही समावेश

Zika Virus Cases In Pune: पुण्यामधील एरंडवणामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली …

Maharashtra Weather News : बापरे! ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहणार; राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षी नैऋत्य मान्सून वारे वेळेआधीच देशात आणि राज्यात दाखल झाले. …