नागपूर हादरलं! पत्नी व मुलीचा खून करून पतीची आत्महत्या ; कारण अद्याप गुलदस्त्यात|Husband commits suicide by killing wife and daughter in Nagpur msr 87


घराच्या अंगणातील झाडाला घेतला गळफास ; आईच्या शेजारी झोपलेला मुलगा सुखरूप

नागपूर एमआयडीसी येथील राजीवनगरात पत्नी व मुलीचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून केल्यानंतर पतीने अंगणातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मागील तीन महिन्यांतील अशा प्रकारची ही दुसरी घटना असून या घटनेमुळे पुन्हा एकदा नागपूर हादरलं आहे. रंजना विलास गवते (४०), अम्रिता (१४) अशी खून झालेल्या माय लेकीची नावं असून विलास चंपतराव गवते (४५, रा. राजीवनगर, तरोडा मोहल्ला) असे आत्महत्या करणाऱ्याचे व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास गवते याचा दुधविक्रीचा व्यवसाय असून त्याच्याकडे काही म्हशी आणि गाई आहेत. पत्नी रंजना, मुलगी अम्रिता आणि मुलगा तेजस हे त्याला व्यवसायात मदत करायचे. गेल्या काही दिवसांपासून विलास याचा स्वभाच चिडखोर बनला होता. त्यामुळे तो घरात कुणाशीही विनाकारण वाद घालत होता. कधी-कधी पत्नी आणि मुलांनाही मारहाण करीत होता. शुक्रवारी रात्री दहा वाजता पत्नी रंजना, मुलगी अम्रिता आणि मुलगा तेजस हे जेवण करून झोपले होते. त्याचवेळी दारुच्या नशेत घरी आलेल्या विलास जेवण न करता झोपला. त्यानंतर मध्यरात्री विलासच्या डोक्यात सैतान संचारला आणि नशेच्या अवस्थेतच झोपेतून उठून पत्नी रंजनाच्या गळ्यावर सत्तूरने वार करत तिचा खून केला. त्यानंतर शेजारीच झोपलेली मुलगी अम्रिता हिच्याही गळ्यावर वार केले व त्या चिमुकलीचा जीव घेतला. दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्यान सत्तूर छताला खोचला. घरातील दोरी काढली आणि अंगणात गेला. करवंदीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :  “युक्रेनमधील भारतीयांना काहीही होणार नाही”, रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा मोदींना शब्द

अशी आली घटना उघडकीस –

पहाटे चार वाजताच्या सुमारास तेजसला जाग आली. त्याला आई आणि बहिण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्याने लगेच शेजारी राहणारे त्याचे काका गणपत यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांना घरी बोलावून आणले. वहिणी आणि पुतणीचा मृतदेह बघून गणपत हादरला. त्याने लगेच तेजसला पोटाशी धरत बाहेर आणले. त्यानंतर भावाचा शोध घेतला असता तोसुद्धा झाडाला गळफास घेऊन लटकलेला दिसला.

…म्हणून तेजस वाचला –

विलास गवते याला काजल (२१), अम्रिका आणि तेजस अशी तीने मुले आहेत. काजलचे दोनच महिन्यांपूर्वी लग्न झाले. त्याचे तेजसवर खूप प्रेम होते. तो सर्वात लाडका होता. त्यामुळेच त्याने पत्नीच्या बाजुलाच झोपलेल्या तेजसवर हल्ला केला नाही. तसेच त्याला आई सत्यफुला हिच्यावरही राग होता. तिलाही ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती. परंतु, ती लहान मुलाकडे राहायला लागल्यामुळे तीसुद्धा सुदैवाने यातून वाचल्याची माहिती विलासच्या नातेवाईकांनी दिली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? हा वाद वर्षानुवर्ष सुरु आहे. आता सरकारने …

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही

Seema Adhye, Zee 24 Taas : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे फडणवीस सरकारने आज आपला अर्थसंकल्प …