Google चं हे फीचर वापरण्यासाठी तुम्हा इंटरनेटची गरज नाही, कसं ते जाणून घ्या

मुंबई : Google हे जगभरातील अनेक लोकांना सेवा पूरवतं. आपला अँड्रॉइड फोन हा संपूर्ण पणे गुगलवरतीच चालतो. फोनमधील ऍप्सपासून ते ब्राउझरवरती सर्च करण्यापर्यंत सगळ्यासाठी आपण गुगलचाच वापर करतो. परंतु आपल्याला गुगल चालवण्यासाठी इंटरनेटची आवशकता असते. सुरुवातीला फोन वापरण्यासाठी फारशी इंटरनेटची गरज नसायची परंतु आता मात्र तुमच्याकडे स्मार्टफोन असेल, तर तुमच्यासाठी इंटरनेट गरजेचं आहे. इंटरनेट शिवाय तुमचा फोन काहीही कामाचा नाही.

परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, गुगल एक अशी सर्वीस देत आहे. जी वापरण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची आवशकता नाही. म्हणजे तुमच्याकडे इंटरनेट नसेल, तरी देखील तुम्ही गुगलची ही सर्विस वापरु शकता.

या सर्विसचं नाव आहे Google Maps, हे ऍप वापरकर्त्यांना मार्ग दाखवते. तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही Google Maps ऑफलाइन देखील वापरू शकता.

गुगल मॅपमध्ये नकाशा सेव्ह करण्याचे वैशिष्ट्य आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तो ऑफलाइन देखील वापरू शकता. तुम्ही एखाद्या दुर्गम भागातून जात असताना आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसताना हे वैशिष्ट्य अतिशय उपयुक्त आहे. अशा परिस्थितीतही गुगल मॅपचे हे फीचर तुम्हाला मार्ग दाखवत राहील.

हेही वाचा :  Salman Khan : सलमान खानला तातडीचा दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार

परंतु हे लक्षात ठेवा की, तुम्हाला ऑफलाइन मोडमध्ये रिअल टाइम ट्रॅफिक अपडेट्स मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा हा मॅप सेव्ह केला असेल, त्यावेळेची तुम्हाला माहिती मिळेल. परंतु या  ऑफलाइन मोडमध्येही, तुम्हाला पर्यायी मार्ग आणि इतर वैशिष्ट्ये मिळणार नाहीत.

तुम्ही Google Maps ऑफलाइन कसे वापरू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सर्व प्रथम, तुम्हाला Google Maps ऍप उघडावे लागेल आणि नंतर प्रोफाइल चिन्हावर क्लिक करावे लागेल, जे वरच्या उजव्या कोपऱ्यात तुम्हाला आढळेल.

येथे तुम्हाला ऑफलाइन नकाशांचा पर्याय मिळेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला सिलेक्ट युवर ओन मॅप या पर्यायावर जावे लागेल.

आता तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणाला टाकावं लागले आणि त्यानंतर हा मॅप डाऊनलोड करुन ठेवा. नकाशा निवडल्यानंतर, वापरकर्त्यांना डाउनलोड पर्यायावर क्लिक करावे लागेल.

या गोष्टींची काळजी घ्या

लक्षात ठेवा की, तुम्ही डाउनलोड करत असलेला ऑफलाइन नकाशावरील रस्ते काही दिवसांना बदलू किंवा बंद होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही नकाशा रिसेंट टाईमिंग वरती डाऊलोड करा. फारपूर्वी डाऊलोड केलेला मॅप वापरू नका.

हेही वाचा :  iPhone 16 सीरीजमध्ये लाँच होणार 5 स्मार्टफोन, किंमत आणि फिचर्स जाणून घ्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …